Hrithik roshan is rumored to be replacing salman khan in sanjay leela bhansalis insha allah | हिरोईन तिच पण हिरोत झाला बदल, भाईजानच्या जागी चक्क ऋतिकची होणार एंट्री?
हिरोईन तिच पण हिरोत झाला बदल, भाईजानच्या जागी चक्क ऋतिकची होणार एंट्री?

संजय लीला भन्सांळी यांचा ‘इंशाअल्लाह’ सिनेमा थंडबस्त्यात गेल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. या सिनेमात सलमान खान आणि आलिया भटच्या जोडीला कास्ट करण्यात आले होते. मात्र रिपोर्टनुसार सलमान यात  चित्रपटात गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप करत होता. सलमान या सिनेमात डेजी शाह आणि वलूशा डिसूजा यांना कास्ट करू इच्छित होता. पण भन्साळी यासाठी तयार नव्हते. मग काय, भन्साळींनी हा प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आणि सलमानही या प्रोजेक्टमधून बाहेर पडला. भन्साळी प्रॉडक्शनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेत सतत हस्तक्षेप केला जात होता. भन्साळी आपल्या चित्रपटांबद्दल मोठ मोठ्या दिग्गजांचे ऐकत नाहीत. पण सलमानला कथेत बदल हवा होता. त्यामुळे हा सिनेमा थंडबस्त्यात गेला होता. 

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, या सिनेमाचे कास्टिंग भन्सांळीनी नव्याने करायला सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार या भूमिकेसाठी आता ऋतिक रोशनच्या नावाचा विचार सुरु आहे. ऐवढेच नाही तर या सिनेमासाठी ऋतिक रोशनने नुकतीच संजय लीला भन्सांळी यांची भेटदेखील घेतली आहे. अजून यासंदर्भातील काही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र अशी शक्यता आहे की इंशा अल्लाहमध्ये ऋतिकची एंट्री होऊ शकते कारण याआधीही ऋतिकने भन्सांळीसोबत काम केले आहे. आता हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे की, भन्सांळी याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार.   

भन्सांळीच्या गुजारिश सिनेमात ऋतिकने काम केले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र ऋतिकच्या भूमिकेचे सगळीकडे कौतूक झाले होते. वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, ऋतिक लवकरच वॉर सिनेमात दिसणार आहे. यात ऋतिक आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा एक अॅक्शनपट आहे.


Web Title: Hrithik roshan is rumored to be replacing salman khan in sanjay leela bhansalis insha allah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.