ठळक मुद्देहृतिक लहान असताना अडखळत बोलायचा. त्यामुळे इतरांशी बोलताना त्याला संकोच वाटायचा. पण या समस्येवर मात करत त्याने कशाप्रकारे यश मिळवले या संघर्षाबाबत एका पुस्तकात वाचायला मिळणार आहे.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक स्टार किड आले आहेत. पण यातील अनेक स्टार किडना आपले स्थान बॉलिवूडमध्ये बनवता आले नाही. मात्र याला हृतिक रोशन हा अपवाद आहे. त्याचे वडील राकेश रोशन यांना मिळालेल्या लोकप्रियतेच्या कित्येक पट अधिक लोकप्रियता हृतिकला मिळाली. हृतिकने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


हृतिकने त्यानंतर फिजा, कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, जोधा अकबर, क्रिश यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. हृतिकचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोक त्याचे फॅन आहेत. हृतिक सातासमुद्रापार देखील फेमस असल्याचे एक नुकतेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे.

हृतिक आज बॉलिवूडमधील सुपरस्टार असला तरी त्याच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो लहान असताना अडखळत बोलायचा. त्यामुळे इतरांशी बोलताना त्याला संकोच वाटायचा. पण या समस्येवर मात करत त्याने कशाप्रकारे यश मिळवले या संघर्षाबाबत त्याने त्याच्या आजवरच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता त्याच्या या संघर्षाची गाथा एका पुस्तकात वाचायला मिळणार आहे. हे पुस्तक भारतातील नव्हे तर आंतराराष्ट्रीय स्तरावरील आहे. बेन ब्रूक्स या प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकात हृतिकच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे. 

Stories for boys who dare to be different या पुस्तकात बीथोवेन, बराक ओबामा, फ्रॅंक ओसन यांसारख्या महान व्यक्तींसह ऋतिकच्या संघर्षाला स्थान देण्यात आले आहे. हृतिकनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. यासोबतच त्याने एक छान पोस्ट लिहिली आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, मला पुन्हा त्या जुन्या आठवणीत रममाण व्हायचं आहे आणि ११ वर्षाच्या त्या ऋतिकला आज हा दिवस दाखवायचा आहे.


Web Title: Hrithik Roshan is part of new book for boys: Wish I could show it to 11-year-old me
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.