ठळक मुद्देलवकरच हृतिक ‘वॉर’ या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे. यात हृतिकशिवाय टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

मिलेनियल सुपरस्टार हृतिक रोशन याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जगातील ‘मोस्ट हॅण्डसम’ पुरूष म्हणून त्याची निवड झाली आहे. 
ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिकच्या लूकची क्रेज भारतातच नाही जगभर आहे. आता ‘ Most Handsome Men in the world in August 2019’ या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. यादीत हृतिकचे नाव अग्रस्थानी असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येतोय. 


रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारत तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हृतिक त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठीही ओळखला जातो. 2002 मध्ये कहो ना प्यार है या चित्रपटातून हृतिकचा डेब्यू झाला. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि यानंतर हृतिकने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2003 मध्ये कोई मिल गया या चित्रपटानेहह त्याची क्रेज निर्माण केली. यानंतरचे क्रिश आणि क्रिश 3 हे सिनेमेही तुफान गाजले. पाठोपाठ अग्निपथ, जोधा अकबर, काबिल हे सिनेमेही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.


नुकताच हृतिकचा ‘सुपर 30’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिकने गणितज्ज्ञ आनंद कुमारची भूमिका साकारली होती. गत 12 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 140 कोटींचा बिझनेस केला.

लवकरच हृतिक ‘वॉर’ या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे. यात हृतिकशिवाय टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. डायरेक्टर सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात ऋतिक आणि टायगर जबरदस्त अ‍ॅक्शन करतांना दिसणार आहेत. ‘वॉर’ हा  पहिला असा चित्रपट आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये शूट केला गेला आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये खतरनाक स्टंट्स आणि अ‍ॅक्शन सीन्स दाखवले गेले आहेत.  ऋतिक आणि टायगरचा एक फाइट सीन फिनलँडमध्ये शूट झाला आहे. तो बर्फावर चालणाºया एका एड्रिनालाइन पम्पिंग कारसोबत चित्रित केला गेला आहे. फिनलँडचा हा भाग आर्कटिक सर्कलमध्ये येतो.

English summary :
Most Handsome Men in the World in August 2019: Hrithik Roshan has been selected as the 'Most Handsome' guy in the world. He is now ranked in the 'Most Handsome Men in the World in August 2019' list. Since Hrithik's name is at the forefront of the list, fans are currently having an atmosphere of excitement and good wishes are also being given to him.


Web Title: Hrithik Roshan makes his way to the #1 position on 'Top 5 Most Handsome Men in the world in August 2019' list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.