हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:00 AM2019-09-29T06:00:00+5:302019-09-29T06:00:02+5:30

द कपिल शर्मा शोमध्ये हृतिक रोशनने जोधा अकबर या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या.

hrithik roshan feds elephant bananas while shooting for Jodha Akbar reveals on the kapil sharma show | हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट

हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देहृतिकने सांगितले की, “हो, हे खरे आहे. मी दोन महिने दररोज त्या हत्तीला खायला घालत होतो, जेणेकरून त्याची माझ्याशी मैत्री होईल.”

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात हृतिक रोशन, वाणी कपूर हजेरी लावणार आहेत.

हृतिक रोशनद कपिल शर्मा शो मध्ये 'वॉर' या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘जोधा अकबर’ असे अनेक धमाकेदार चित्रपट देणारा हृतिक त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या आठवणींविषयी सांगताना दिसणार आहे. ‘जोधा अकबर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी सांगताना हत्तीशी मैत्री करण्याच्या हेतूने त्याने त्याला प्रेमाने केळी खाऊ घातली होती हे सांगितले.

द कपिल शर्मा शोमध्ये हृतिकने हत्तीला 40,000 पेक्षा जास्त केळी खाऊ घातली होती हे खरे आहे का असे कपिलने विचारले असता त्या प्रसंगाबद्दल हृतिकने सांगितले की, “हो, हे खरे आहे. मी दोन महिने दररोज त्या हत्तीला खायला घालत होतो, जेणेकरून त्याची माझ्याशी मैत्री होईल.” परिस्थितीचे वर्णन करताना तो म्हणाला, “तो अतिशय महाकाय हत्ती होता... तो इतका मजबूत होता की, तो केवळ शिंकला तरी भोवतालच्या लोकांना उडवून देण्यास तो समर्थ होता. आम्ही त्याच्यासोबत एका खड्ड्यात शूटिंग करत असताना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने सगळ्यांना सांगितले की, हे अतिशय धोकादायक दृश्य असणार आहे आणि ज्यांना भीती वाटत असेल ते माघार घेऊ शकतात. ही घोषणा आशुतोषने केल्यानंतर शेवटी हत्तीसोबत फक्त मीच उरलो होतो. मी त्याला नेहमी केळी खाऊ घालत असल्यामुळे बहुधा त्याने माझ्यासोबत व्यवस्थितपणे चित्रीकरण केले.”


 
द कपिल शर्मा शो मध्ये हृतिक त्याचे डाएट विसरून वाणी कपूर, कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंह यांच्यासोबत समोसा पार्टीचा आनंद घेताना दिसणार आहे. तसेच ‘घुंगरू टूट गए’ या त्याच्या लोकप्रिय गाण्यावर तो थिरकताना देखील दिसणार आहे.

Web Title: hrithik roshan feds elephant bananas while shooting for Jodha Akbar reveals on the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.