दंगल दिग्दर्शक नितेश तिवाराने जेव्हापासून रामायण 3D ची घोषणा केल्यापासून फॅन्स या सिनेमाला घेऊन एक्सायडेट आहे. या सिनेमाचा एकूण बजेट 500 कोटींचा आहे हा सिनेमा 3Dमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार ऋतिक रोशन यात प्रभू रामाची  भूमिका साकारणार आहे तर दीपिका पादुकोण सीता देवींची भूमिका साकारणार आहे.  


रिपोर्टनुसार, नितेश तिवारीने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले की, सध्या या सिनेमाचे पेपर वर्क सुरु आहे. बाकी गोष्टीच्या प्रोसेस आम्हाला आधी संपवायच्या आहे. कास्टबाबत अजून काही विचारला नाही केला.  

ऋतिका आणि दीपिकाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. गेल्या तीन वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. हिंदी, तमिळ, मराठी, गुजराती आणि पंजाबी सिनेमातील कलाकार यात सामील होणार आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर,  ऋतिक रोशनचा सुपर 30 सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर, ती छपाकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. छपाकचे शूटिंग काही दिवसांपूर्वी संपले आहे आणि सध्या ती 83 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात ती रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.  

English summary :
Ramayana 3D Movie: Nitesh Tewar announced Ramayana 3D Movie. The total budget of this movie is almost 500 crores. The movie is going to be released in 3D. According some resources Hrithik Roshan will play the role of Prabhu Rama and Deepika Padukone will play the role of Sita Devi.


Web Title: Hrithik roshan and deepika padukone to share screen in ramayana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.