Hrithik Roshan ठरणार KGF 3 चा मोठा चेहरा? मेकर्सने केला सिनेमाबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:05 PM2022-05-28T18:05:42+5:302022-05-28T18:06:18+5:30

Hrithik Roshan : अफवांनुसार, ऋतिक रोशन या सिनेमाचा मोठा चेहरा होऊ शकतो. त्याला या सिनेमासाठी अ‍ॅप्रोच करण्यात आलं आहे. आता केजीएफच्या मेकर्सने यावर मौन सोडलं आहे.

Hrithik Roshan a part of KGF 3 makers shocking answer | Hrithik Roshan ठरणार KGF 3 चा मोठा चेहरा? मेकर्सने केला सिनेमाबाबत खुलासा

Hrithik Roshan ठरणार KGF 3 चा मोठा चेहरा? मेकर्सने केला सिनेमाबाबत खुलासा

googlenewsNext

यश स्टारर KGF Chapter 2 सिनेमाने जगभरात रेकॉर्डतोड कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड त्याने तोडले. सिनेमाने ४६ दिवसात १२३० कोटी कमाई केली, ही काही साधी गोष्ट नाही. या सिनेमाच्या यशानंतर रॉकी भाईची फॉलोइंग वाढली. आजही हा सिनेमा थिएटरमध्ये सुरू आहे. फॅन्स आतापासूनच या सिनेमाचा तिसरा पार्ट येण्याची वाट बघत आहेत. अफवांनुसार, ऋतिक रोशन (Hrithik Roshan) या सिनेमाचा मोठा चेहरा होऊ शकतो. त्याला या सिनेमासाठी अ‍ॅप्रोच करण्यात आलं आहे. आता केजीएफच्या मेकर्सने यावर मौन सोडलं आहे. सोबतच सिनेमाचं कास्टिंग पूर्ण झालं की नाही याचीही माहिती दिली.

मेकर्सने जेव्हा केजीएफच्या तिसऱ्या पार्टची घोषणा केली होती तेव्हा याचा दुसरा पार्ट सिनेमागृहात यशस्वीपणे सुरू होता. केजीएफचं प्रॉडक्शन हाऊस होमबेलचा को-फाउंडर विजयने Asianet Newsable सोबत बोलताना ऋतिक रोशनच्या कास्टिंगबाबत सांगितलं की, 'केजीएफ चॅप्टर ३ यावर्षी तर येणार नाहीये. आमच्याकडे काही प्लान्स आहेत. प्रशांथ नील सध्या सलारच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यशही त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करणार आहे. आम्ही वाट बघत आहोत, सगळे एकत्र येण्याची आणि केजीएफ ३ वर काम करण्याची. सध्यातरी आमच्याकडे फिक्ड डेट नाही. जेव्हा तिसऱ्या पार्टचं काम सुरू होईल तेव्हा सांगितलं जाईल'.

विजय पुढे म्हणाले की, 'जेव्हा आम्ही डेट फायनलाइज करू, तेव्हाच आम्ही स्टारकास्टबाबत विचार करू. इतर कास्टही आम्ही तेव्हाच फायनल करू. त्यासोबतच हेही बघितलं जाईल की, सिनेमासाठी कुणाकडे कधी वेळ आहे. सगळं काही काम सुरू करण्यावर निर्भर आहे'.

KGF Chapter 2 चं दिग्दर्शन प्रशांथ नीलने केलं होतं. सिनेमाचं प्रॉडक्शन मोठ्या बजेटचं होतं. सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत होते. रवि या सिनेमाचा कंपोजर होता. तर एडिटिंग उज्ज्वल कुलकर्णी याने केलं होतं.
 

Web Title: Hrithik Roshan a part of KGF 3 makers shocking answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.