ठळक मुद्देया चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 18.81 करोड रुपये इतकी कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 37.89 करोड इतके कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे.

हाऊसफुल 4 या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई केली होती.

हाऊसफुल 4 या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 19 करोड आठ लाखांची कमाई केली असून हाऊसफुल या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांमध्ये सगळ्यात मोठी ओपनिंग हाऊसफुल 4 या चित्रपटाला मिळाली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 18.81 करोड रुपये इतकी कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 37.89 करोड इतके कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कृती सेनन, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृती खरबंदा, पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आपल्याला दोन वेगवेगळे काळ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सगळ्याच कलाकारांचे दोन वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत.

दिवाळीच्या सणामुळे सध्या अनेकांना सुट्ट्या असल्याने याचा फायदा नक्कीच चित्रपटांना होणार आहे. हाऊसफुल 4 या चित्रपटासोबतच भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला सांड की आँख आणि राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला मेड इना चायना हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण या सगळ्यातही प्रेक्षक हाऊसफुल 4 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी तर या चित्रपटाला केवळ दीड स्टार दिले आहेत. हाऊसफुल या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या भागांपैकी सगळ्यात निराशा करणारा हा भाग असल्याचे त्यांनी त्यांच्या समीक्षणात म्हटले आहे तर काहींनी या चित्रपटाला तीन-साडे तीन स्टार दिले आहेत.

‘हाऊसफुल 4’चे ‘शैतान का साला’ हे गाणे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच हिट झाले होते. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या गाण्यानंतर सोशल मीडियावर  #TheBalaChallenge या चॅलेंजनेही धुमाकूळ घातला होता. अनेक कलाकारांनी आतापर्यंत हे चॅलेंज पूर्ण केले आहे. अक्षय कुमारने सर्वप्रथम हे चॅलेंज सुरू केले होते आणि सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच या चॅलेंजने वेड लावले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Housefull 4 Box Office Day 2: Akshay Kumar's Diwali Offering Earns Rs 37.89 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.