Hotness Overloaded : रिचा चढ्ढाने शेअर केला हॉट फोटो; यापूर्वी कधीही पाहिला नसेल तिचा ‘असा’ फोटो!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 06:08 PM2020-05-24T18:08:02+5:302020-05-24T18:08:37+5:30

रोज काय नवीन करावे, जेणेकरून आजचा दिवस आनंदात जाईल, असा विचार हे सेलिब्रिटी करतात. मग कुणी जेवण बनवतानाचा फोटो टाक, कुणी व्यायाम करतानाचा, कुणी निवांत पुस्तक वाचतानाचा फोटो टाकताना दिसतात.

Hot photo shared by Richa Chadha; Never seen a photo of her like this before !! | Hotness Overloaded : रिचा चढ्ढाने शेअर केला हॉट फोटो; यापूर्वी कधीही पाहिला नसेल तिचा ‘असा’ फोटो!!

Hotness Overloaded : रिचा चढ्ढाने शेअर केला हॉट फोटो; यापूर्वी कधीही पाहिला नसेल तिचा ‘असा’ फोटो!!

googlenewsNext

 सध्या लॉकडाऊनमुळे सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी घरातच बंदिस्त आहेत. रोज काय नवीन करावे, जेणेकरून आजचा दिवस आनंदात जाईल, असा विचार हे सेलिब्रिटी करतात. मग कुणी जेवण बनवतानाचा फोटो टाक, कुणी व्यायाम करतानाचा, कुणी निवांत पुस्तक वाचतानाचा फोटो टाकताना दिसतात. असाच एक प्रयत्न आता रिचा चढ्ढानेही केला आहे. तिनेही तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तुम्ही पाहाल तर तिच्या हॉटनेसच्या प्रेमात पडला नाहीत तरच नवल...

रिचा चढ्ढा ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसोबत ती कायम लाइव्ह चॅट, फोटो पोस्टिंग करत असते. तिने नुकतेच पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. तिच्या हॉटनेसवर फिदा होऊन तिला प्रचंड मोठया प्रमाणात लाईक्स आणि कमेंटसही मिळताना दिसत आहेत. 

रिचा चढ्ढा गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेता अली फजल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्यासोबत तिचे एप्रिलमध्ये लग्न होणार होते. पण, कोरोनाच्या संकटामुळे आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. त्यांनी रजिस्टर्ड मॅरेजसाठी नोंदणीही केली होती. 

रिचाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, रिचा चढ्ढा ही दिग्दर्शिका आश्विनी अय्यर यांच्या ‘पंगा’ चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत कंगना राणौत, नीना गुप्ता, जस्सी गिल हे देखील दिसले होते. 

Web Title: Hot photo shared by Richa Chadha; Never seen a photo of her like this before !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.