फेशिअल सर्जरी फसल्यामुळे तिला ओळखणं झालं होते कठीण, आता बिकनी फोटोंनी उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:06 PM2020-03-19T12:06:44+5:302020-03-19T12:12:56+5:30

नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती, त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला.

Hot minissha lamba raising temperatures sultry pictures gda | फेशिअल सर्जरी फसल्यामुळे तिला ओळखणं झालं होते कठीण, आता बिकनी फोटोंनी उडवली खळबळ

फेशिअल सर्जरी फसल्यामुळे तिला ओळखणं झालं होते कठीण, आता बिकनी फोटोंनी उडवली खळबळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर  मोनोकिनी  बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप हॉट वाटते आहे.


कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. 2008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सारख्या सिनेमांतही ती झळकली.

पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.


2005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.


२०१७ मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले.

Web Title: Hot minissha lamba raising temperatures sultry pictures gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.