Esha Gupta : ईशा गुप्ताने काउचवर बसून दिल्या अशा पोज, पाहून फॅन्सच्या हृदयाची वाढली धडधड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:13 PM2022-05-17T18:13:59+5:302022-05-17T18:16:17+5:30

Esha Gupta Photos: फोटोत बघू शकता की, ईशा गुप्ताने स्ट्रॅपी बॉडी हगिंग ड्रेस घातला आहे आणि ती काउचवर बसून हॉट पोज देत आहे. मोकळे केस आणि न्यूड मेकअपने तिचा लूक आणखीन हॉट झाला आहे.

Hot Esha Gupta gives bold poses in front camera | Esha Gupta : ईशा गुप्ताने काउचवर बसून दिल्या अशा पोज, पाहून फॅन्सच्या हृदयाची वाढली धडधड

Esha Gupta : ईशा गुप्ताने काउचवर बसून दिल्या अशा पोज, पाहून फॅन्सच्या हृदयाची वाढली धडधड

googlenewsNext

Esha Gupta Photos: ईशा गुप्ता (Esha Gupta) बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची एक झलक बघण्यासाठी तिचे फॅन्स आतुर असतात. सोशल मीडियावर तर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जेव्हा जेव्हा ती तिचे सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करते तेव्हा वातावरण तापत असतं. असंच काहीसं तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे झालं आहे. तिने शेअर केलेला फोटो पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.

ईशा गुप्ता (Esha Gupta) ने इन्स्टग्रामवर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती फारच हॉट दिसत आहे. तिने बॉडीकॉन ड्रेस घालून कॅमेरासमोर अशी काही पोज दिली की, फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली आहे. तिच्या या फोटोला भरपूर लाइक आणि कमेंट्स मिळत आहेत. 

फोटोत बघू शकता की, ईशा गुप्ताने स्ट्रॅपी बॉडी हगिंग ड्रेस घातला आहे आणि ती काउचवर बसून हॉट पोज देत आहे. मोकळे केस आणि न्यूड मेकअपने तिचा लूक आणखीन हॉट झाला आहे. या फोटोत तिची परफेक्ट फीगरही दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ईशाने तिचा रेड कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला होता. हा फोटो सुद्धा व्हायरल झाला होता. या फोटोत ती डीपनेक ब्लाउजसोत पेटीकोट घालून दिसली होती. पण तिने साडी नेसली नव्हती. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती बंद झाली होती.

ईशा गुप्ताच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती 'आश्रम ३' या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात ईशाचा बोल्ड लूकही दिसला. या सीरीजमध्ये बॉबी देओल, त्रिधा चौधरी, अदिती पोहनकर, दर्शन कुमार असे बरेच कलाकार आहेत. ३ जूनला ही वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म एसएक्स प्लेअरवर रिलीज होईल.
 

Web Title: Hot Esha Gupta gives bold poses in front camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.