भूमी पेडणेकरला करायचा आहे या हॉट अभिनेत्रीचा फोन नंबर ब्लॉक, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 01:57 PM2018-03-10T13:57:06+5:302018-03-10T19:27:06+5:30

अभिनेत्री वाणी कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यातील नाते खूपच चांगले आहे. दोघींनीही यश राजच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. नुकताच ...

This hot actress's phone number is blocking the ground, but why? | भूमी पेडणेकरला करायचा आहे या हॉट अभिनेत्रीचा फोन नंबर ब्लॉक, पण का?

भूमी पेडणेकरला करायचा आहे या हॉट अभिनेत्रीचा फोन नंबर ब्लॉक, पण का?

googlenewsNext
िनेत्री वाणी कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यातील नाते खूपच चांगले आहे. दोघींनीही यश राजच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. नुकताच भूमीने वाणी कपूरसोबत तिचा २७वा वाढदिवस सेलिब्रेट केला. मग अचानक असे काय घडले असेल की भूमी वाणीचा फोन नंबर ब्लॉक करू इच्छिते? नुकत्याच एका मुलाखतीत भूमीने तिची ही इच्छा बोलून दाखविली आहे. आता तुम्ही विचार करीत असाल की, वाणी आणि भूमीच्या नात्यात दरार तर निर्माण झाली नाही ना? पण तसे काहीही झाले नसून, दोघींमधील नाते अजूनही ट्रॅकवर आहे. वास्तविक, भूमीच्या अशाप्रकारच्या इच्छेमागे एक कारण आहे. 



भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराणा काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. याठिकाणी भूमीला प्रश्न विचारण्यात आला की, जर तुला संधी मिळाली तर तू कोणाचा फोन नंबर ब्लॉक करू इच्छिणार? याचे उत्तर देताना भूमीने लगेचच वाणी कपूरचे नाव घेतले. जेव्हा नेहाने याचे कारण विचारले तर भूमीने सांगितले की, जर मी दुसºया कोणाचे नाव घेतले असते तर कदाचित अडचण आली असती, परंतु भूमी माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला समजूून घेईल. 



या चॅट शोदरम्यान आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक सिक्रेटचा बिनधास्तपणे खुलासा केला. या दोघांची आॅनस्क्रीन जोडी ‘दम लगा के हईशा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. भूमी सध्या अभिषेक चौबे यांच्या ‘सोन चिरैया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर वाणी कपूरला सिद्धार्थ आनंदच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये ती हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत बघावयास मिळणार आहे. 

Web Title: This hot actress's phone number is blocking the ground, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.