सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक येणार असून या चित्रपटात बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्राची वर्णी लागल्याचे समजते आहे. या चित्रपटासाठी ती इंग्लंडला रवाना झाल्याचे समजते आहे. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेकच्या चित्रीकरणासाठी परिणीती लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहे आणि जुलैच्या मध्यापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या जोरदार तयारीला परिणीतीने सुरूवात केली आहे. 


परिणीती चोप्रा या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक असून ती म्हणाली की, यापूर्वी मी कधीही अशाप्रकारची भूमिका केलेली नाही. त्यामुळे माझ्या चाहत्यांनादेखील मी वेगळ्याच रुपात पहायला मिळणार आहे. ही भूमिका माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे अशा नाविन्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.


 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा २०१५ साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटीत महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे.

ही महिला एका हरवलेल्या व्यक्तीच्या तपास प्रक्रियेत गुंतते आणि तिचे जीवन कसे धोक्यात येते, याचे वर्णन करण्यात आले आहे. ती हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे.

या चित्रपटातील या भूमिकेसाठी एमिलीचे समीक्षकांनी खूप कौतूक केले होते. परिणीती चोप्रा नव्या अंदाजात या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.


Web Title:  Hindi remake of 'The Girl On The Train', the entry of Bollywood's Babli Girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.