खल्लास!! अर्ध्या रात्री हिना खानने शेअर केलेत बोल्ड फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 02:48 PM2019-09-20T14:48:08+5:302019-09-20T14:48:39+5:30

होय, काही तासांपूर्वी हिनाने स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

hina khan share bold pictures on social media |  खल्लास!! अर्ध्या रात्री हिना खानने शेअर केलेत बोल्ड फोटो 

 खल्लास!! अर्ध्या रात्री हिना खानने शेअर केलेत बोल्ड फोटो 

googlenewsNext
ठळक मुद्देहिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात.

टीव्ही अभिनेत्री हिना खान  लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. साहजिकच हिना चर्चेत आहेत. आता तर ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, काही तासांपूर्वी हिनाने स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिना ब्लॅक नाइटीमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसतेय.

'Throw me to the wolves and I will come back leading the pack #Mood'असे तिने हे बोल्ड फोटो शेअर करताना लिहिले आहे.

‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली. जुन्या कोमोलिकाला विसरून प्रेक्षक नव्या कोमोलिकाच्या प्रेमात पडले. पण काहीच महिन्यानंतर हिना ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडणार अशी बातमी आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. ही बातमी खरी ठरली आणि हिना ‘कसौटी जिंदगी के 2’मधून गायब झाली.  कशासाठी तर चित्रपटासाठी. होय,   हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे.  यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे.  


हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला. साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली.  बिग बॉस 11  आणि  खतरों के खिलाडी सिझन 8 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली.

Web Title: hina khan share bold pictures on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.