बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाने छपाक चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यातील दीपिकाचा लूक पाहून सगळेच जण हैराण झाले होते. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारते आहे. या पोस्टरमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसते आहे. त्यानंतर या 'छपाक'च्या शूटिंगचे फोटो समोर आले ज्यात दीपिकाला ओळखणे कठीण झाले होते. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती आहे.

नुकताच दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून भररस्त्यात एकटी उभी होती. मात्र तिला कुणीच ओळखू शकले नाही. या व्हिडिओत अभिनेता विक्रांत मेसीसोबत बाइकवरून उतरताना दीपिका दिसली. विक्रांत हेल्मेट काढून तिथून निघून गेला आणि दीपिका त्याच ठिकाणी उभी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दीपिका 'छपाक'मधील मालतीच्या लूकमध्ये दिसली. त्यावेळी तिला कुणीच ओळखले नाही. 


'छपाक' चित्रपटात अ‍ॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसते आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी तिच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.

विक्रांतने दीपिकासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले की, 'दीपिकासारख्या अभिनेत्रीसोबत काम करणे फक्त संधी नसून जबाबदारी देखील आहे. मी नर्वस आणि उत्सुक आहे.' '

 

छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत. १० जानेवारीला 'छपाक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Hey father ... 'Chhapak' Girl Deepika is still standing in the crowd, nobody knows
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.