Here’s Why Allu Arjun Doesn’t Give Discount To His Father Allu Aravind | वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण

वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण

ठळक मुद्देमीडिया रिपोर्टनुसार, अल्लू वर्षाला 15 कोटींची कमाई करतो.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साऊथ इंडस्ट्रीतील बडा स्टार. साऊथचा मोस्ट स्टायलिश स्टार अशी त्याची ओळख आहे. शिवाय साऊथचा महागडा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो. अल्लूचे वडिल अल्लू अरविंद ( Allu Aravind ) हे दिग्दर्शक व निर्माता आहेत. वडिलांनी प्रोड्यूस केलेल्या अनेक सिनेमात अल्लू दिसला आहे. अशात स्वत:च्या वडिलांकडून अर्जुन किती फी घेत असावा? असा प्रश्न चाहत्यांना पडणे साहजिक आहे. एका ताज्या मुलाखतीत अर्जुनला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. वडिलांनी प्रोड्यूस केलेले सिनेमे तू फ्रीमध्ये करतोस की मग वडिलांना काही डिस्काऊंट देतोस? असा मजेदार प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर अल्लू अर्जुनचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... (Allu Arjun Doesn’t Give Discount To His Father Allu Aravind )

तो म्हणाला, मी वडिलांना अजिबात डिस्काऊंट वगैरे देत नाही. कारण मला ते कधीच नफ्यातील वाटा देत नाहीत, मग मी त्यांना डिस्काऊंट का द्यावे? माझी एक मार्केट व्हॅल्यू आहेत आणि पापा मला त्यानुसार पेमेंट करतात. आम्ही आमच्या कामाच्या आड आमचे बापलेकाचे नाते अजिबात येऊ  देत नाही. तसेही माझे पापा अल्लू अरविंद एक चतूर, चाणाक्ष निर्माते आहेत. चित्रपट सुरु होण्यापूर्वीच ते मला फी देऊन मोकळे होतात. चित्रपट चालला तर मी नफ्यातील वाटा मागू नाही, कदाचित म्हणून ते असे करत असावे, असेही त्याने हसत हसत सांगितले.

मिस्टर वासू हे माझ्यात आणि माझ्या वडिलांमध्ये मध्यस्थ असतात. पापाचा सिनेमा करायचा म्हटले की, मि़ वासू त्यांच्या अपेक्षा सांगतात आणि मी माझ्या. चर्चा करून माझी फी ठरते. चर्चेनंतर दोन दिवस मी आणि पापा एकमेकांशी बोलत नाही. तिस-या दिवशी मात्र तू चांगलाच मोलभाव करतोस, असे म्हणून पापा माझी जरा मजा घेतात.

अल्लू अर्जुनचा गतवर्षी प्रदर्शित झालेला Ala Vaikunthapurramloo हा सिनेमा त्याच्या वडिलांनीच प्रोड्यूस केला होता. यात पूजा हेगडे अल्लूच्या अपोझिट दिसली होती. या सिनेमाने बक्कळ कमाई केली होती. 
अल्लू अर्जुनला अभिनयाचे बालकडू घरातच मिळाले. त्याचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे प्रसिद्ध विनोदवीर आहेत. त्याचे वडिल दिग्दर्शक आणि निर्माता. अल्लू अर्जुन तेलगू सुपरस्टार चिरंजीवीचा भाचा आहे. घरातच अशा चित्रपट क्षेत्रातील जाणकार व कलाकारांच्या सहवासात अल्लू अर्जुन मोठा झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू वर्षाला 15 कोटींची कमाई करतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Here’s Why Allu Arjun Doesn’t Give Discount To His Father Allu Aravind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.