हृतिक रोशनच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 11:38 AM2020-01-04T11:38:36+5:302020-01-04T11:39:09+5:30

Hrithik Roshan's House : हृतिक रोशनच्या फ्लॅटचे फोटो पाहून व्हाल थक्क

Have you seen the photos of Hrithik Roshan's luxurious house? | हृतिक रोशनच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?, फोटो पाहून व्हाल थक्क

हृतिक रोशनच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?, फोटो पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन नेहमी त्याच्या आगामी चित्रपट व भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्याने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून तो स्टार झाला. हृतिक शेवटचा सुपर ३० चित्रपटात झळकला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

हृतिक रोशन मुंबईत बंगल्यात रहात नसला तरी त्याचा जुहूमधील फ्लॅट पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही.


जुहूमध्ये हृतिक रोशनचा ४ बीएचके फ्लॅट असून त्याच्या घरातून समुद्र दिसतो. 


त्याचे हे घर ३ हजार स्क्वेअर फूटाचे असून हा भाग लिव्हिंग रुम आणि दोन बेडरुमध्ये विभागण्यात आला आहे.


घरातील प्रत्येक कोपरा न् कोपरा डिझाईन केलेला असून घरातील बारीक बारीक गोष्टींकडेेदेखील बारकाईने लक्ष देण्यात आला आहे.

डायनिंग टेबलची रचनाही कलात्मकरित्या करण्यात आली आहे.

हृतिकचे म्हणाल तर याचवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ असे त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत.

या दोन्ही चित्रपटांनी बंपर कमाई केली.


 

Web Title: Have you seen the photos of Hrithik Roshan's luxurious house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.