‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 11:20 AM2019-01-24T11:20:26+5:302019-01-24T11:25:39+5:30

गतवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा याचे नशीब सध्या जोरावर आहे, असेच म्हणायला हवे.

Has Aayush Sharma signed Rajkumar Santoshi's next film? | ‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!

‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!

googlenewsNext
ठळक मुद्देआयुष शर्मा तूर्तास आपल्या दुस-या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यासाठी आयुषला १६ किलो वजन वाढवायचे आहे. आत्तापर्यंत त्याने १० किलो वजन वाढवले आहे.

गतवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा याचे नशीब सध्या जोरावर आहे, असेच म्हणायला हवे. होय, आयुषचा डेब्यू अगदी वाजत-गाजत झाला. आयुषचे लॉन्चिंग ग्रॅण्ड व्हावे, यासाठी अख्खे खान कुटुंब झटले.खुद्द सलमान खानने आयुषच्या लॉन्चिंगचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतला. पण दुदैवाने आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.  पण तरिही आयुषला कामाची कमतरता नाही. ताजी बातमी खरी मानाल तर आयुषला तिसरा चित्रपटही मिळाला आहे. लवकरच तो दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या एका चित्रपटात दिसणार आहे. 




मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, राजकुमार संतोषी यांनी आपल्या एका रोमॅन्टिक चित्रपटासाठी आयुषच्या नावाला पसंती दिली आहे. तूर्तास या चित्रपटा्नच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. ही स्क्रिप्ट पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल. आयुषला संतोषींनी ऐकवलेली कथा आवडली आणि त्याने लगेच या चित्रपटासाठी होकार दिला. येत्या काही दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा होणर आहे.
आयुष शर्मा तूर्तास आपल्या दुस-या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यासाठी आयुषला १६ किलो वजन वाढवायचे आहे. आत्तापर्यंत त्याने १० किलो वजन वाढवले आहे. आणखी ६ किलो वाढवणे बाकी आहे. या चित्रपटात आयुष अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. या दुस-या चित्रपटाचे शूटींग पूर्ण होताच आयुष राजकुमार संतोषीच्या चित्रपटात बिझी होईल.
आयुष शर्मा हा सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. २०१४ मध्ये अर्पिता व आयुषचे लग्न झाले होते. दोघांनाही २ वर्षांचा एक मुलगा आहे.

Web Title: Has Aayush Sharma signed Rajkumar Santoshi's next film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.