Harman baweja birthday know about actors love life with priyanka chopra | या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा आणि प्रियंका चोप्राचे ब्रेकअप, दोन वर्षे होते रिलेशनशीपमध्ये

या कारणामुळे झाले होते हरमन बावेजा आणि प्रियंका चोप्राचे ब्रेकअप, दोन वर्षे होते रिलेशनशीपमध्ये

बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्या सिनेमापासून चांगली फॅन फॉलोईंग निर्माण करणाऱ्या अभिनेता हरमन बावेजाचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 झाला.ज्यावेळी हरमन बावेजाने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा तो हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झाला होता. हरमनने इंडस्ट्रीत दणक्यात एंट्री केली खरी पण बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही.. 

हरमन एकेकाळी प्रियंका चोप्रासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होता. ‘लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवरच प्रियंका व हरमनची मैत्री झाली होती. त्यावेळी हरमन इंडस्ट्रीत अगदी नवखा होता. पण प्रियंकासोबत मात्र त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत हरमनने या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते.

‘माझ्याकडे प्रियंकासाठी वेळ नव्हता. माझे आधीच दोन सिनेमे फ्लॉप झाले होते. अशात मला ‘वॉट्स यॉर राशी’ हा सिनेमा मिळला. माझ्यावरचा दबाव वाढला होता. हा चित्रपट फ्लॉप होता कामा नये, हा माझा प्रयत्न होता. माझा संपूर्ण फोकस या चित्रपटावर होता. शिवाय दिग्दर्शकानेही मला पर्सनल रिलेशन बाजूला ठेवून कामावर लक्ष देण्याची तंबी दिली होती. प्रियंकाला माझा वेळ हवा होता. पण मी वेळ देऊ शकत नव्हतो. यामुळेच आमच्यात मतभेद निर्माण झालेत आणि आम्ही वेगळे झालोत,’ असे त्याने सांगितले होते.

हरमनचे पाठोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रियंकाने त्याच्यासोबतचे नाते तोडले, अशीही चर्चा त्याकाळात होती. अर्थात हरमनने ही चर्चा नाकारली होती. ‘मी अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही. प्रेमात असलेल्या दोन व्यक्तिच त्यांच्यात नेमके काय झाले, हे सांगू शकतात. यश अपयशामुळे प्रेमात काहीही फरक पडत नाही,’असेही त्याने सांगितले होते. प्रियंका आणि हरमनचे नातं दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Harman baweja birthday know about actors love life with priyanka chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.