'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर

By अमित इंगोले | Published: September 29, 2020 09:39 AM2020-09-29T09:39:56+5:302020-09-29T09:41:30+5:30

रिलीजआधी हा सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप सोडण्यासाठी जाणार आहे. तेच या सिनेमाच्या ट्रेलरनेही अनेकांची मने जिंकली आहेत.

Harami Trailer : Emraan Hashmi as crime lord is the leader of Mumbai's pickpocketers | 'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर

'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर

googlenewsNext

एकेकाळी रोमॅंटिक हिरो आणि सीरीअल किसर नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेता इम्रान हाश्मी यावेळी एका वेगळ्याच अंदाजात लोकांसमोर येणार आहे. इम्रान हाश्मीच्या आगामी 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून यातील त्याचा लूक पाहून सगळेच हैराण झाले आहेत. रिलीजआधी हा सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप सोडण्यासाठी जाणार आहे. तेच या सिनेमाच्या ट्रेलरनेही अनेकांची मने जिंकली आहेत.

'हरामी' च्या ट्रेलरबाबत सांगायचं तर यात मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका लहान मुलाला गुन्हेगारी विश्वात पोहोचवणाऱ्या गुन्हेगाराची ही कथा आहे. इथे लहान मुलांना घाबरवून-धमकावून चोरी करायला भाग पाडलं जातं. या टोळीचा मुख्य आहे इम्रान हाश्मी. ही भूमिका फारच दमदार दिसत आहे. आपल्या अदाकारीने इम्रान हाश्मीने या भूमिकेला परफेक्ट रूप दिलंय. हा असा व्हिलन आहे जो इंग्रजीत बोलतो आणि लहान मुलांची चूक त्याला अजिबात सहन होत नाही.

दरम्यान, या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन श्याम मदिराजू याने केलंय. तर सिनेमाची निर्मिती इम्रान हाश्मीचं प्रॉडक्शन हाऊस यूएस बेस्ड प्रॉडक्शन हाऊस जर्म कलेक्टिव आणि इतर काही प्रॉडक्शन हाऊससोबत मिळून केलंय. २१ ऑक्टोबरला बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. 
 

Web Title: Harami Trailer : Emraan Hashmi as crime lord is the leader of Mumbai's pickpocketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.