ठळक मुद्दे सनीच्या प्रत्येक चित्रपटाचे स्क्रिप्ट र्सर्वप्रथम तिचा नवरा डेनियल वेबर वाचतो. त्याने होकार दिल्यानंतरच सनी चित्रपट स्वीकारते.

सनी लिओनी सन २०१० मध्ये टॉप 12 पॉर्न स्टार्सच्या यादीत होती. पण याचदरम्यान सनीने पॉर्न इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिची पाऊले बॉलिवूडकडे वळली. जिस्म 2, रागिणी एमएमएस 2, जॅकपॉट, अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केले. रईस या सिनेमात किंगखान शाहरुख खानसोबत आयटम डान्स करतानाही ती दिसली. सनीने आपला भूतकाळ कधीच लपवला नाही. एकेकाळी मी पॉर्न स्टार होते, याचा मला अभिमान आहे. मला त्याचा मुळीच पश्चाताप नाही, असे सनी अगदी बेधडकपणे सांगते. तिचा हाच बेधडक, बिनधास्त स्वभाव तिच्या चाहत्यांना आवडतो. सनीने डेनियल वेबरसोबत लग्न केले. आताश: ती तीन मुलांची आई आहे. यापैकी नोआ आणि अशर हे सरोगसीतून जन्माला आलेले आहेत तर निशा ही सनीची दत्तक मुलगी आहे. सनीच्या प्रत्येक चित्रपटाचे स्क्रिप्ट र्सर्वप्रथम तिचा नवरा डेनियल वेबर वाचतो. त्याने होकार दिल्यानंतरच सनी चित्रपट स्वीकारते. सनी प्रचंड वाचनप्रेमी आहे, तिला पार्टी करण्यापेक्षा पुस्तकांमध्ये रमणे अधिक आवडते. पाणीपुरी, दहीचाट हे तिचे विशेष आवडते भारतीय पदार्थ आहेत.

आज सनीच्या वाढदिवसानिमित्त तिचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या डान्स व्हिडीओंनी सोशल मीडियावर धूम केली होती. चाहत्यांनी हे व्हिडीओ डोक्यावर घेतले. काहींनी तिला यावरून ट्रोलही केले. पण सनीने अशा ट्रोलर्सची कधीच पर्वा केली नाही. तेव्हा पाहा तर सनीचे सोशल मीडियावर धूम करणारे हे व्हिडीओ... 


Web Title: Happy Birthday Sunny Leone: sunny leone 5 best dance viral video on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.