शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:40 PM2021-07-31T17:40:28+5:302021-07-31T17:41:00+5:30

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. जर शिल्पा शेट्टीला सपोर्ट करता येत नसेल तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या असे ट्वीट करत म्हटले आहे.

Hansal Mehta slams viewers, says Let Law decide & Leave Shilpa Shetty alone | शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं

शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं

googlenewsNext

राज कुंद्रा पॉर्नग्राफी प्रकरण समोर आल्यापासून सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. शिल्पा शेट्टीही राज कुंद्रामुळे चांगलीच अडचणीत येऊ शकते. शिल्पा शेट्टीच्या सपोर्टमध्ये कोणताही सेलिब्रेटी बोलताना दिसत नाही.

एरव्ही आपली विविध मुद्दयांवर आपली मतं मांडणा-या सेलिब्रेटींनी शिल्पाच्याबाबतीत मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शिल्पा शेट्टीच्या सपोर्टमध्ये येत इतर सेलिब्रेटींनाही चांगलेच सुनावले आहे. हंसलत मेहता यांनी बॉलिवूडच्या कलाकारांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 


दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. जर शिल्पा शेट्टीला सपोर्ट करता येत नसेल तर  किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या. या कठिण काळात तिला शांतीत राहू द्या. आरोप सिद्ध होण्याआधीच तिला दोषी ठरवले जात आहे.  ही खूपच वाईट गोष्ट आहे.असं हंसल मेहता यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.


तर दुस-या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, सुखाचे क्षण सेलिब्रेट करायला सगळेच एकत्र येतात, पण दुःखात कोणीच येत नाही. मौन धारण करणे हा तर एक पॅटर्नच बनलाय. सेवटी खरं काय आणि खोटं काय यानेही कोणाला काय फरक पडणार आहे.

तर तिस-या ट्वीटमध्य म्हटलंय की, सेलिब्रेटीवर एखाद्या गोष्टीचा आरोप झालाच तर त्याच्या खासगी आयुष्यातच जास्त डोकावले जाते. त्या सेलिब्रेटीची प्रतिमा मलिन करणं, त्याच्याविषयी नको ते मत तयार करणं, नको त्या गोष्टींवर चर्चा करणं, उगाच बातम्या पसरवणं असे प्रकार घडतात याबाबत हंसल मेहता यांनी खंत व्यक्त केली आहे.  

राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबियांची मानहानी करणारे अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित मीडिया हाऊसच्याविरोधात तिने मानहानी दावा केला आहे. प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचा बदनामीकारक, अयोग्य वार्तांकन करण्यापासून प्रतिबंध करावा, अशी अंतरिम मागणी शिल्पाने दाव्यात केली होती. 

Web Title: Hansal Mehta slams viewers, says Let Law decide & Leave Shilpa Shetty alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.