बॉलिवूडमधील काही स्टारकिड्स बऱ्याचदा चर्चेत येत असतात. कधी ते त्यांच्या फोटोंमुळे किंवा अफेयरमुळे वा आगामी प्रोजेक्टमुळे. मात्र नुकतेच एका स्टारकिड्सने शेअर केलेल्या फोटोंमुळे या तीन स्टार किड्स चर्चेत आल्या आहेत. 


अभिनेत्री अनन्या पांडे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक बालपणीचा फोटो शेअर केला. या फोटोत तिच्यासोबत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान व संजय कपूरची मुलगी शनाया कपूरदेखील आहे. त्या तिघींनी हातात खेळण्यातील बंदुक असून त्या पोजमध्ये पहायला मिळत आहेत. या तिघी फोटोंमध्ये खूप क्यूट दिसत आहेत.

खरेतर अनन्या पांडे हिने हा जुना फोटो शेअर करण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा वाढदिवस आहे. तिला शुभेच्छा देण्यासाठी अनन्याने हा फोटो शेअर करून म्हटले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा लिटिल बेबी. सुई... आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. चार्लिस अँजेल.

अनन्या पांडे, सुहाना खान व शनाया कपूर ह्या तिघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या बऱ्याचदा एकत्र पहायला मिळतात. तसेच त्या व्हॅकेशनलादेखील एकत्र जातात.

अनन्या पांडे हिने नुकतेच स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ व तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अनन्या पांडे हिच्या अभिनयाचे सगळीकडून खूप कौतूक झाले.

या चित्रपटानंतर आता ती पति पत्नी और वो सिनेमात झळकणार आहे. 


Web Title: Guess this Bollywood Star Kids?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.