बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता अशी गोविंदाची ओळख. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही जीवापाड प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचाच बोलबाला होता. त्यामुळंच की काय त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा नंबर वन अशी उपाधी रसिकांनी देऊन टाकली. त्याच्या या अभिनयाच्या जोरावर त्याला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. गोविंदा रिल लाइफमध्ये जसा आहे किंबहुना त्याहून अधिक चांगला माणूस तो रिअल लाइफमध्येही आहे.

याची प्रचितीही वारंवार येते. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचं रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. गोविंदाप्रमाणेच त्यांच्या लेकीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र तिला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही. मात्र आता सगळीकडे चर्चा आहे ती गोविंदाच्या मुलाची. गोविंदाच्या मुलाचे नाव आहे यशवर्धन आहुजा. 

आपल्या वडिलांप्रमाणेच यशवर्धनसुद्धा स्टायलिश आणि हॅडसम आहे. यशवर्धनने लंडनच्या मेट स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केला आहे. मात्र यशवर्धनला सिनेनिर्मितीमध्ये विशेष आवड आहे. यशवर्धन बॉलीवुडच्या विविध इव्हेंट्सलाही हजर असतो. इम्तियाज अली यशवर्धनचा सर्वात आवडीचा दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. गोविंदानने डेव्हिड धवन यांच्या विविध सिनेमात काम केलं. 

गोविंदाप्रमाणेच त्याच्या लेकालाही डेव्हिड धवन दिग्दर्शक म्हणून आवडतात. त्यामुळे डेव्हिड धवन यांच्या सिनेमात तो झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. एकूणच काय तर सध्या बीटाऊनमध्ये यशवर्धनची चर्चा ऐकायला मिळतेय. त्यामुळे यशवर्धनचं डॅशिंग व्यक्तीमत्त्व आणि हॉट अंदाज पाहून तो लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असंच दिसतंय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Govinda's son Yashvardhan Ahuja Too Handsome,Female Fans Will Be Dying To See Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.