जुना गोविंदा पवित्र होता, आत्ताचा...! गोविंदाचा खुलासा ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:00 AM2021-03-16T08:00:00+5:302021-03-16T08:00:02+5:30

आजही चाहते गोविंदावर तितकेच प्रेम करतात. पण आज तो बॉलिवूडमध्ये फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. तूर्तास गोविंदाची एक मुलाखत चांगलीच गाजतेय.

govinda reveals he is no longer pious actor says i party smoke and drink become more corrupt | जुना गोविंदा पवित्र होता, आत्ताचा...! गोविंदाचा खुलासा ऐकून थक्क व्हाल

जुना गोविंदा पवित्र होता, आत्ताचा...! गोविंदाचा खुलासा ऐकून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देइंडस्ट्रीत माझ्याविरोधात कटकारस्थाने रचली गेलीत, असा आरोपही त्याने या मुलाखतीत केला.

अभिनेता गोविंदा एकेकाळी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होता. त्याचा सिनेमा म्हटल्यावर त्यावर चाहत्यांच्या उड्या पडायच्या. त्याचा डान्स तर असा की, त्यावर चाहते अक्षरश: फिदा होते. आजही चाहते गोविंदावर तितकेच प्रेम करतात. पण आज तो बॉलिवूडमध्ये फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. तूर्तास गोविंदाची एक मुलाखत चांगलीच गाजतेय. या मुलाखतीत गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या वादावर बोलला. याशिवाय स्वत:च्या पर्सनल लाईफबद्दलही बोलला. पण तो जे काही बोलला, ते वाचून तुम्हाला धक्का बसेल.

गोविंदा एक श्रद्धाळू अभिनेता आहे. पूजाअर्चा करणारा, आस्तिक अशी त्याची ओळख आहे. पण आता म्हणे गोविंदा असा राहिलेला नाही. होय, हे आमचे नाहीत तर त्याचेच शब्द आहे. आता मी पूर्णपणे बदललो आहे. आधीचा गोविंदा खूप पवित्र होता. पण आत्ता जो गोविंदा आहे तो कठोर झालाय, असे त्याने स्वत: सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाला त्याच्या आध्यात्मिक स्वभावाबद्दल विचारले. तू आताश: अधिक आस्तिक होताना दिसतोय, याकडे लक्ष वेधले असता, अजिबात नाही, नेमके याच्या उलट होतेय, असे गोविंदा म्हणाला.

मी आता अधिक भ्रष्ट व कठोर होतोय. आता मी पार्टी करतो, सिगारेट फुंकतो आणि दारूही पितो. जुना गोविंदा पवित्र होता. आधी माझा भावूक व संवेदनशील स्वभाव माझ्या कामाआड यायचा. पण आता मी अजिबात भावूक होत नाही. परिस्थितीचा सामना मी अधिक प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल पद्धतीने करतो, असे तो म्हणाला.
इंडस्ट्रीत माझ्याविरोधात कटकारस्थाने रचली गेलीत, असा आरोपही त्याने या मुलाखतीत केला. गेल्या 14-15 वर्षांत मी पैसे गुंतवलेत आणि मला जवळपास 16 कोटींचा तोटा झाला. लोक माझ्यासोबत अतिशय वाईट पद्धतीने वागलेत. यातले काही लोक माझ्याच फिल्म इंडस्ट्रीतले होते. माझ्या चित्रपटांना थिएटर्स मिळाली नाहीत. माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला, असे गोविंदा म्हणाला.

Web Title: govinda reveals he is no longer pious actor says i party smoke and drink become more corrupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.