गोविंदा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. एकेकाळी गोविंदाचा सिनेमा म्हटल्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडत. आज गोविंदा बॉलिवूडमध्ये फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून त्याची क्रेझ कमी झालेली नाही. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात गोविंदाने एक खुलासा केला होता. हे रहस्य खुद्द गोविंदाने इतक्या वर्षानंतर का उघड केले या मागच कारण अद्यापही गुलदस्त्याच आहे. 

भूमिका कोणतीही असो तिला न्याय देणारी अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे. बॉलिवूडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले. छम छम करता हैं... या अगं बाई अरेच्चा सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाईलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. प्रत्येकजण आपल्या मेहनतीवर यश संपादन करत असतो. मात्र सोनाली बेंद्रेला पहिला ब्रेक गोविंदाने मिळवून दिला असल्याचे खुद्द गोविंदानेच एका कार्यक्रमात सांगितले होते. 

जी मुलगी त्यावेळी गोविंदाला सुंदर वाटायची तिला गोविंदा सिनेमात हिरोईन बन असा सल्ला द्यायचा. त्यात असेच सोनाली ब्रेंदे दिसली ती खूप सुंदर दियासची तिला गोविंदाने तू इतकी सुंदर दिसतेस सिनेमात हिरोइन म्हणून काम देतो तुला असे विचारताच सोनालीनेही होकार दिला होता आणि तिची अभिनेत्री म्हणून वाटचाल सुरु झाली असेल असे गोविंदाने सांगितले होते. फार कमी लोकांना हे माहित होते. पण अचानक गोविंदाने हा खुलासा का केला, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

'जिस देस में गंगा रेहता है' सिनेमात गोविंदा आणि सोनाली बेंद्रे या दोघांची रोमँटीक केमिस्ट्री रसिकांना भावली होती. या सिनेमात दोघांच्याही अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले होते. मात्र सोनाली बेंद्रेने गोविंदासह सिनेमात झळकण्यापूर्वी ती मॉडेलिंग करत होती.

अतुल अग्निहोत्रीसह सोनालीने नाराज सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हे सत्य गोंविदाच काय कोणीही नाकारू शकत नाहीय. बहुधा गोविंदा या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Govinda gave the first break in Bollywood to this Marathi actress, a revelation that he himself had made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.