अक्षय-करिनाच्या फॅन्ससाठी खुशखबर, Good Newwz ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 04:18 PM2019-12-28T16:18:47+5:302019-12-28T16:20:28+5:30

गुड न्यूज या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.

Good Newwz Box Office Collection: Akshay Kumar's new film is a winner; likely to rake in Rs 18 cr on Day 1 | अक्षय-करिनाच्या फॅन्ससाठी खुशखबर, Good Newwz ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई

अक्षय-करिनाच्या फॅन्ससाठी खुशखबर, Good Newwz ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई

googlenewsNext
ठळक मुद्देगुड न्यूज या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 18 करोडची कमाई केली असून मुंबईप्रमाणेच दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अक्षय कुमार, करिना कपूर, दलसित दोसांज आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या गुड न्यूज या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता समीक्षकांनंतर प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.

गुड न्यूज या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 18 करोडची कमाई केली असून मुंबईप्रमाणेच दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुड न्यूज या चित्रपटाला सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कडवे आव्हान असताना देखील गुड न्यूजने खूपच चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई अशीच राहिली तर हा चित्रपट 150-200 कोटी कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

गुड न्यूज या चित्रपटाचा विषय हा आजवरच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दिग्दर्शक राज मेहता ‘गुड न्युज’ हा अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटातील दोन्ही जोडपे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. पण, त्यात जो काही गोंधळ उडतो, त्यातून चित्रपटात धम्माल गमतीजमतींचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे कथानक हे अत्यंत मनोरंजक आणि गंमतीदार असे असून ‘गुड न्यूज’ हा अत्यंत कॉमेडी, रोमान्स आणि धम्माल गंमतीजमतींचा पॅकेज चित्रपट आहे. 

झी स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शन्स प्रस्तुत, राज मेहता दिग्दर्शित, हिरू यश जोहर, अरूण भाटिया, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खैतान निर्मित या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे असेच म्हणावे लागेल.  

Web Title: Good Newwz Box Office Collection: Akshay Kumar's new film is a winner; likely to rake in Rs 18 cr on Day 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.