खुशखबर! 'मिर्झापूर'चा येणार तिसरा सीझन, कायम राहणार कालीन भैयाचा 'भौकाल'

By तेजल गावडे | Published: November 12, 2020 04:30 PM2020-11-12T16:30:51+5:302020-11-12T16:31:41+5:30

मिर्झापूर २ला मिळालेल्या प्रतिसादानंतर तिसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Good news! The third season of 'Mirzapur' is coming, Kalin Bhaiya's 'Bhoukal' will continue | खुशखबर! 'मिर्झापूर'चा येणार तिसरा सीझन, कायम राहणार कालीन भैयाचा 'भौकाल'

खुशखबर! 'मिर्झापूर'चा येणार तिसरा सीझन, कायम राहणार कालीन भैयाचा 'भौकाल'

googlenewsNext

मिर्झापूर २ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या दुसर्‍या सीझनने सुवर्ण इतिहास रचला आहे. मिर्झापूरच्या सीझन २ चे सर्वोच्च यश पाहता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनला हिरवा कंदील दाखवला आहे.

मिर्झापूर २मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, श्वेता त्रिपाठी शर्मा रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर यांच्या प्रमुख भूमिका असून सोबतच अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्डा, मनुषि चड्ढा आणि राजेश तैलंग हे कलाकार सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत. या सीरिजला जगभरातून मोठ्या प्रमाणात कौतुक व प्रेक्षकांचा प्रतिसाद प्राप्त झाला आहे. या सीझनमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेण्युली आणि ईशा तलवार यांनी रसिकांच्या मनावर अमिट छाप उमटवली आहे.

एक्सेल एन्टरटेन्मेंटचे निर्माते रितेश सिधवानी म्हणाले, दोन दमदार सीझनमध्ये मिर्झापूरने संपूर्ण मनोरंजनाच्या जगात खळबळ माजविली आहे आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ शिवाय हे घडविणे अशक्य होते. रिलीजच्या काही दिवसांतच सोशल मीडियावरील प्रतिक्रियेतून या शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे अतूट प्रेम, या नवीन सीझनमध्ये सुद्धा दिसून आले आणि या प्रतिसादामुळे आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत.

मिर्झापूरचे जग हे सत्ता, राजकारण आणि सूड या भोवतीच फिरते. एकीकडे मिर्झापूर ताब्यात घेण्यासाठी मुन्ना आणि गुड्डू यांच्यातली लढाई विकोपाला जाते तर दुसरीकडे कथानक आपल्याला राजकीय शक्ती च्या गल्ली मध्ये नेवून सोडते जिथे राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील गूढ परस्परसंबंध पाहण्यास मिळतो. मिर्झापूरच्या स्त्रिया ह्या अत्याधिक धाडसी आणि अधिक कुटील झाल्या आहेत आणि कोणत्याही माध्यमांचा वापर करून त्या आपले उद्दिष्ट सध्या करण्यात समर्थ आहेत. शेवटी कोण जिंकेल? त्रिपाठींना आव्हान देण्यासाठी कोणी उरले आहे का? या सीझनमध्ये नियम तसाच राहतो - रक्त सांडल्याशिवाय येथे कुणीही टिकणार नाही परंतु पडदा मात्र व्यापक होतो.
मिर्झापूर २ नंतर आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Good news! The third season of 'Mirzapur' is coming, Kalin Bhaiya's 'Bhoukal' will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.