मलायका अरोराच्या गोवा व्हॅकेशनमधील ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:33 PM2021-01-20T12:33:48+5:302021-01-20T12:34:23+5:30

मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती.

Glamorous photos of Malaika Arora's Goa vacation caused a stir on social media | मलायका अरोराच्या गोवा व्हॅकेशनमधील ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलायका अरोराच्या गोवा व्हॅकेशनमधील ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. असे वाटतंय की मलायको अरोराची गोवा ट्रिप अद्याप संपलेली नाही आणि अद्याप ती सोशल मीडियावर गोवा ट्रीपचे फोटो शेअर करत असते. मलायकाच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळताना दिसते आहे. 


मलायकाने नुकतेच गोवा व्हॅकेशनमधील बिकनीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत. यात मलायकाच्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

मलायकाने बिकनीतील फोटो गोवा व्हॅकेशन दरम्यान सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो एका रात्रीत खूप व्हायरल झाले होते. आतादेखील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 


मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि बहिण अमृता अरोरासोबत काही जवळच्या फ्रेंड्ससोबत ख्रिसमसच्या आधी गोव्यात पोहचली होती. न्यू इअर गोव्यात साजरा केल्यानंतर सर्वजण मुंबईत परतले आहेत.


मलायका अरोराने २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी त्यांचं नांत ऑफिशल केलं होतं. मलायकाने अर्जुनबरोबर तिचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसे, मलायका आणि अर्जुन यापूर्वीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, परंतु तोपर्यंत त्यांनी हे स्वीकारलेले नव्हते की ते एकमेकांना डेट करतायेत.

Web Title: Glamorous photos of Malaika Arora's Goa vacation caused a stir on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.