जेनेलिया डिसूजा रितेश देशमुख नव्हे तर 'या' ला करतेय किस, पाहा हा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:51 PM2021-01-25T16:51:18+5:302021-01-25T16:53:30+5:30

जेनेलियानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Genelia D'Souza shares cute video with her dog in instagram | जेनेलिया डिसूजा रितेश देशमुख नव्हे तर 'या' ला करतेय किस, पाहा हा व्हिडिओ

जेनेलिया डिसूजा रितेश देशमुख नव्हे तर 'या' ला करतेय किस, पाहा हा व्हिडिओ

googlenewsNext
ठळक मुद्देजेनेलियाने या व्हिडिओसोबत खूप छान कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, तुमच्या स्वतःपेक्षा तुमच्यावर प्रेम करणारी केवळ या पृथ्वीववर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कुत्रा...

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवडमधील सगळ्यात क्यूट कपलमधील एक कपल मानले जाते. त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांचे दोघांचे अनेक फोटो, व्हिडिओ आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. जेनेलियाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत जेनेलियासोबत त्यांच्या घरातील कुत्रा दिसत असून ती त्याला किस करताना दिसत आहे. तसेच रितेश आणि त्यांची मुले देखील या कुत्र्याचे लाड करताना दिसत आहेत.

जेनेलियाने या व्हिडिओसोबत खूप छान कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, तुमच्या स्वतःपेक्षा तुमच्यावर प्रेम करणारी केवळ या पृथ्वीववर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कुत्रा... जेनेलियाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ काहीच तासांत सहा लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच जेनेलियाचे हे म्हणणे खरे असल्याचे देखील फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत. 

रितेश आणि जेनेलिया यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. तिने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा आणि रितेशचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत आपल्याला त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. जेनेलियाच्या गालावर रितेश किस करताना या व्हिडिओत आपल्याला दिसला होता. हा व्हिडीओ शेअर करताना जेनेलियाने फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी असे लिहिले होते.        

जेनेलिया आणि रितेशच्या प्रेम प्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.

Web Title: Genelia D'Souza shares cute video with her dog in instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.