​सत्ते पे सत्ता या चित्रपटातील या अभिनेत्याच्या पत्नीसोबत झाला होता गँगरेप... घाबरून कधीच केली नाही वाच्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 07:09 AM2018-02-10T07:09:13+5:302018-02-10T12:39:13+5:30

अभिनेता सुधीर यांनी १९६२ पासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २०० हून देखील अधिक चित्रपटांमध्ये काम ...

The gang had raped the actress's wife in Satte Pe Sarka's film and did not panic. | ​सत्ते पे सत्ता या चित्रपटातील या अभिनेत्याच्या पत्नीसोबत झाला होता गँगरेप... घाबरून कधीच केली नाही वाच्यता

​सत्ते पे सत्ता या चित्रपटातील या अभिनेत्याच्या पत्नीसोबत झाला होता गँगरेप... घाबरून कधीच केली नाही वाच्यता

googlenewsNext
िनेता सुधीर यांनी १९६२ पासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २०० हून देखील अधिक चित्रपटांमध्ये काम केले. धर्मात्मा, मजबूर, शराबी, शान यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे तर विशेष कौतुक झाले होते. सुधीर यांचा विवाह शीला रे या मॉडेल सोबत झाला होता. शीला रे यांनी काही चित्रपटांमध्ये अगदी छोट्या भूमिका साकारल्या. शीला रे आणि महेश भट्ट यांच्या अफेअरची देखील त्या काळात चांगलीच चर्चा होती. शीला रे या बॉलिवूडमध्ये काम करत नसल्या तरी बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यांचा त्या हिस्सा असायच्या. बॉलिवूड मधील अनेकजण त्यांच्या खूप जवळचे होते. शीला रे यांच्या आयुष्यात एक अतिशय वाईट प्रसंग घडला होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्या हा प्रसंग विसरू शकल्या नव्हत्या. 

sudhir

अभिनेता सुधीर आणि शीला रे यांना अशोक नावाचा एक मुलगा आहे. त्यांच्या अशोक बनकर या मुलानेच त्यांच्या आईच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. शीला रे यांच्यावर १९७७ मध्ये गँगरेप झाला होता. अशोक बनकरने मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आईवर गँगरेप झाला होता आणि त्या इसमांनी तिला बेशुद्धावस्थेत बिल्डिंगच्या बाहेर फेकून दिले होते. माझी आई बेशुद्धावस्थेत बिल्डिंगच्या बाहेर पडली असल्याचे वॉचमनच्या लक्षात आले आणि त्या वॉचमननेच आईला घरात आणले होते. त्यावेळी मी केवळ १२ वर्षांचा होतो. आईची ती अवस्था पाहून मला माझे अश्रू आवरत नव्हते. तिच्यासोबत काय घडले तिने काहीच सांगितले नव्हते. तिने अनेक वर्षांनी या गोष्टीविषयी मला सांगितले. मुबंईतील उषा किरण या इमारतीत तिच्यासोबत बलात्कार करण्यात आला होता. या बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये काही लोकांनी माझ्या आईला डॅग्स देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. ते तीन लोक होते. त्यापैकी एक फोटोग्राफर होता. त्याने गँगरेपचे फोटो देखील काढले होते. माझी आई इतकी घाबरली होती की, तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची देखील हिंमत केली नाही.  
शीला रे यांचे १९९० साली निधन झाले. त्यावेळी त्या केवळ ४४ वर्षांच्या होत्या. 

Web Title: The gang had raped the actress's wife in Satte Pe Sarka's film and did not panic.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.