अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास करणारा अभिनेता आर. माधवन इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' असं असून या चित्रपटाचे शूटिंग नुकतंच पूर्ण झालंय. या सिनेमाचं भारत, फ्रान्स, जर्मनी, रुस व अमेरिका या ठिकाणी शूटिंग पार पडलं आहे. या चित्रपटात गेम ऑफ थ्रोन्स सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेता रॉन डोनाची एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहेत.

'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग कंपनी तयार करत आहेत. हिंदी, तमीळ व इंग्रजी या तीन भाषेत बनत असलेल्या या चित्रपटाचं अखेरचं शूटिंग सर्बियामध्ये नुकतंच पार पडलं. या चित्रपटाची रॅप पार्टी देखील नुकतीच पार पडली. यावेळी संपूर्ण टीमने आर. माधवनचा पहिला चित्रपट रहना है तेरे दिल मेंमधील सुपरहिट गाणं सच कह रहा है जमाना या गाण्यावर डान्स केला. 


'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपटात आर. माधवनसोबत अभिनेत्री सिमरन दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समजू शकलेली नाही.

हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी या चित्रपटाचा लूक आंतरराष्ट्रीय चित्रपटासारखा ठेवला आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहरूख खान देखील एका खास भूमिकेत दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटातील सीन चित्रीत करत असताना शाहरूख इतका इमोशनल झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.


Web Title: Game of Thrones Actors Ron Donachie Join R Madhavan's Rocketry The Nambi Effect
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.