अध्ययन सुमनची नवी गर्लफ्रेंड आहे प्रचंड हॉट, तिला पाहून Ex गर्लफ्रेंड कंगनाला विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:50 PM2019-10-12T12:50:52+5:302019-10-12T12:54:31+5:30

कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययन आता स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत आहे. मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते.

Forget Kangana Ranaut, meet Adhyayan Suman's stunning new girlfriend Maera | अध्ययन सुमनची नवी गर्लफ्रेंड आहे प्रचंड हॉट, तिला पाहून Ex गर्लफ्रेंड कंगनाला विसरून जाल

अध्ययन सुमनची नवी गर्लफ्रेंड आहे प्रचंड हॉट, तिला पाहून Ex गर्लफ्रेंड कंगनाला विसरून जाल

googlenewsNext
ठळक मुद्देमायराच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर ती तिचे बिकनीतील फोटो अनेकवेळा पोस्ट करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला अध्ययन आणि तिचे देखील अनेक फोटो पाहायला मिळतात. 

शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनने हाल ए दिल या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अध्ययन चित्रपटसृष्टीत येऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. पण तरीही त्याला बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करता आली नाहीये. अध्ययन त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. एकेकाळी तो बॉलिवूडमधील आजची आघाडीची अभिनेत्री कंगना राणौतला डेट करत होता. पण काही कारणामुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले. 

अध्ययन आता पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आला आहे. अध्ययन स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत असून मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर ती तिचे बिकनीतील फोटो अनेकवेळा पोस्ट करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला अध्ययन आणि तिचे देखील अनेक फोटो पाहायला मिळतात. 

अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे. 

कंगना राणौतने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, शिवीगाळ केली होती आणि इतकंच नाही तर सँडल फेकून मारली होती असा आरोप अध्ययनने काही वर्षांपूर्वी कंगनावर केला होता. हा सगळा प्रकार 2016 साली हृतिक रोशनने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीहून परतताना घडल्याचा आरोप अध्ययने केला होता. त्यावेळी कारमध्ये कंगणाने कारमध्ये असभ्य वर्तन करत मारहाण केल्याचंही अध्ययने म्हटले होते. शिवाय जबरदस्तीने घरी सोडायला सांगितले होते. मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता. अध्ययने कंगणासह राज-2 या सिनेमात काम केले होते. त्याचदरम्यान त्यांचे अफेअर सुरू झाले असे म्हटले जाते. 

Web Title: Forget Kangana Ranaut, meet Adhyayan Suman's stunning new girlfriend Maera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.