बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असूनही पहिल्यांदाच नर्व्हस दिसली करिना कपूर, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:20 PM2019-11-28T13:20:24+5:302019-11-28T13:29:41+5:30

'गुड न्यूज' सिनेमात करीनासोबत अक्षय कुमार, दलजीत दोसांझ व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

First Time In Her Career Kareena Kapoor Looks uncomfortable, know the Reason | बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असूनही पहिल्यांदाच नर्व्हस दिसली करिना कपूर, हे होते कारण

बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असूनही पहिल्यांदाच नर्व्हस दिसली करिना कपूर, हे होते कारण

googlenewsNext

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं बेबो करिना कपूरबरोबर.


बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.. झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलीय ते जगजाहीर आहेच. तसेच ती स्टायलिश लूकमुळेही सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. लवकरच करिनाचा 'गुड न्यूज' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याचनिमित्ताने सध्या सिनेमाची टीम प्रमोशन करण्यात बिझी आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला यावेळी. करिनाचा खूप ग्लॅमरस अंदाजात समोर आली. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले होते. पण हाच डिझायनर ड्रेस करिनासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे ती भलतीच नर्व्हस झाली. अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून गेली. 

 


'गुड न्यूज' सिनेमात करीनासोबत अक्षय कुमार, दलजीत दोसांझ व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय कुमार व करीना कपूर या जोडीची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती आणि पुन्हा एकदा 'गुड न्यूज' सिनेमाच्या निमित्ताने त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा सिनेमा २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: First Time In Her Career Kareena Kapoor Looks uncomfortable, know the Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.