दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जून कपूरच्या घरी गेल्या. त्यांच्यासोबत पापा बोनी कपूर आणि मोहित मारवाहसोबत अंतरा मोतीवाला हेदेखील उपस्थित होते. अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अर्जुन जेव्हा त्याच्या या चित्रपटाची शूटिंग करीत होता, तेव्हाच श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. शूटिंग सोडून लगेचच अर्जुन मुंबईत पोहोचला होता. वास्तविक अर्जुनने नेहमीच जान्हवी आणि खुशीपासून दूर राहणे पसंत केले. तो कधीच त्यांच्या जवळ गेला नाही. परंतु श्रीदेवी यांच्या निधनामुळे सर्व रूसवे दूर करीत त्याने आपल्या दोन्ही बहिणींना सावरले. सध्या तो आपल्या दोन्ही बहिणींना आधार देत आहे. 

श्रीदेवी यांच्या निधनाच्या वेळी अर्जुनने जान्हवी, खुशी आणि पापा बोनी कपूरला आधार दिल्याचे दिसून आले. तो या दु:खाच्या क्षणी त्यांच्यासोबत उभा होता. अर्जुनची बहीण अंशुलादेखील जान्हवी आणि खुशीला सपोर्ट करताना दिसून आली. तिने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना दु:खाच्या काळात खूप धीर दिला. ती सातत्याने या दोघींसोबत बघावयास मिळाली. आता अर्जुन आणि अंशुलाने सर्व काही विसरून जान्हवी आणि खुशीसह पापा बोनी कपूरलाही आपलेसे केले आहे. वृत्तानुसार, अर्जुन आणि अंशुला पापा बोनी कपूरच्या घरी शिफ्ट होण्याचा प्लॅन करीत आहेत. कारण त्याला दोन्ही बहिणींना एकटे सोडायचे नाही. या संकटाच्या काळात त्याला बहिणींना धीर द्यायचा आहे. जेव्हा बोनी कपूरने श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते, तेव्हा अर्जुन आणि त्याच्या आईने त्यांना सोडले होते. तेव्हापासून हे दोघे विभक्त राहात असत. Web Title: For the first time, half-brother Arjun Kapoor went home and Happi Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.