पहिल्यांदाच बादशाहने करिअरबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, आता करणार हेही काम

By गीतांजली | Published: August 13, 2018 12:28 PM2018-08-13T12:28:52+5:302018-08-13T13:01:14+5:30

2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली मला त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते.

First time Badhshah took important decesion about career now he will do this work also | पहिल्यांदाच बादशाहने करिअरबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, आता करणार हेही काम

पहिल्यांदाच बादशाहने करिअरबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, आता करणार हेही काम

ठळक मुद्दे'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यानंतर मला खरी ओळख मिळालीमला मराठीत ही अनेक रॅप करायची गेल्या दिवसांपासून इच्छा आहे

गीतांजली आंब्रे  

2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली मला त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते. लवकरच त्याचा 'वन' म्हणजेच  Original Never End हा अल्बम रिलीज होतेय त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा खास संवाद

 

तुझ्या नव्या येणाऱ्या 'वन' या अल्बमबद्दल काय सांगशील, यात प्रेक्षकांना काय नवे बघायला मिळणार आहे ?
या अल्बममध्ये तुम्हाला 17 गाणी ऐकायला मिळणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मी अल्बमवर काम करतोय. पुलीक मान यांच्याकडे मी ज्यावेळी गेलो तेव्हा त्यांनी या अल्बममधील गाण्यांचे दिग्दर्शन करण्यास होकार दिला. त्यामुळे यातील गाण्यांचे दिग्दर्शन त्यांनी केलयं हे आणि ते फारचं चांगले झाले आहे. 90 च्या दशकात अल्बम खूपच चांगले चालत होते त्यानंतर ते येणे अचानक बंद झाले त्यामुळे अनेक वर्षांपासून माझी अल्बम करण्याचाी इच्छ होती.   

तू इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहेस स तर इंजिनीअर ते रॅपर या प्रवासाबाबत काय सांगशील ?
मला सुरुवातीपासून गाण्यात काही तरी करायचे होते. आई-वडिलांच्या इच्छेखातर मी इंजिनिरिंगचे शिक्षण घेतले पण मला माहिती होते मला काय करायचे आहे ते. मला लहानपणापासूनच संगीताची गोडी होती त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर मी त्याकडे वळलो. मला असे वाटते आजच्या पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत म्हणजे भविष्यात ते जे करतील ते चांगलेच करतील मग ते करिअर कशातही असो.  लवकरच मी रॅपबरोबर दिग्दर्शनही करणार आहे तसेच मी माझे हॉटेलदेखील सुरु करतोय    

प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पाईंट येतो ज्यानंतर त्याव्यक्तीचे आयुष्य बदलते, तुझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट काय ठरले ?
'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यानंतर मला खरी ओळख मिळाली कारण या गाण्यात माझा चेहरा (हसून) देखील दिसला होता. याआधी माझं 'सैटरडे -सैटरडे' हे गाणं सुद्धा आले होते मात्र अभी तो पार्टी शुरु हुई है'नंतर प्रेक्षक मला बादशाह म्हणून ओळखायला लागले. 

तू एका रिअॅलिटी शोला जज करतोस, तर रिअॅलिटी शो बाबत तुझं मत काय आहे?
रिअॅलिटी शोला घेऊन मी खूप खुश आहे. मी ज्या रिअॅलिटी शोचा भाग आहे त्यात रॅपरसुद्धा आहेत यागोष्टीचा मला आनंद आहे कारण रॅम्परसादेखील एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आपली कला सादर करायला. रिअॅलिटी शोजमुळे देशातील चांगले टॅलेंट जगासमोर येतेय.  

भविष्यात तुला मराठीत रॅप करायला आवडले का ?
मुळातच मला मराठी भाषा मला खूप आवडते. मराठी माणसंही मला तेवढीच आवडतात. हो, नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून माझी ही इच्छा आहे.मला मराठीत काही तरी वेगळेपणा आहे अस सतत वाटते. माझ्या टीममध्ये ही जास्त मराठीच लोक आहेत. मला मुंबईचा वडापाव ही खूप आवडतो. 
 

Web Title: First time Badhshah took important decesion about career now he will do this work also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Badshahबादशहा