सोनू की टीटू की स्वीटी आणि लुका छुपी चित्रपटानंतर कार्तिक आर्यननं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. आता त्याच्याकडे चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स आहेत. कार्तिक बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवली आहे. त्याचा इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नाही. त्यामुळे त्याला सुरूवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागला होता. त्याने त्याच्या पहिल्या ऑडिशनची आठवण सांगताना सांगितले की त्याला ऑडिशन न घेता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


एका मुलाखतीत कार्तिकनं त्याच्या करियरच्या स्ट्रगलच्या काळातील आठवणी सांगताना म्हणाला की, एका डिओडरंटच्या जाहिरातीसाठी मी ऑडिशन द्यायला गेलो होतो. ती माझी पहिलीच ऑडिशन होती आणि मला बाहेरूनच नकार दिला होता.


बॉलिवूडमध्ये काम मिळावं म्हणून कार्तिकनं बरेच ऑडिशन्स दिले होते. त्यामुळे कॉलेजमधील हजेरी कमी झाल्याने शिक्षणदेखील मध्येच सोडावं लागल्याचंही त्याने सांगितलं होतं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कार्तिक जेव्हा मुंबईत आला, तेव्हा तो 2 BHK फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होता. इतकेच नाही तर लोकल ट्रेनमधून तो तिकिटविना प्रवास करायचा. त्यावेळी त्याच्याकडे पैसे देखील नसायचे असं त्यानं सांगितलं.


सध्या कार्तिक आगामी चित्रपट पती पत्नीऔर वोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणारेय.

या शिवाय तो लव आज कल चित्रपटाच्या सीक्वलमध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान काम करताना दिसणार आहे.


Web Title: In the first audition, this actor was shown to be an outdoor, now he is Bollywood star
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.