चाहत्यांमध्ये न पाहिलेले फोटो पाहण्याची खूप उत्सुकता असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत हृतिक रोशन दिसतो आहे आणि त्याच्यासोबत या फोटोत आणखीन काही सेलेब्स आहेत.


या फोटोत हृतिक रोशनसोबतआलिया भट दिसते आहे. हा जुना फोटो असून हा फोटो फिल्ममेकर अनु रंजन यांनी शेअर केलाय. अनु रंजन यांच्या दोन मुली अनुष्का रंजन व आकांक्षा रंजन या आलिया भटच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. अनुष्का रंजन २०१५ साली प्रदर्शित झालेल्या वेडिंग पुलाव चित्रपटात दिसली होती. या फोटोत आलियासोबत तिची बहिण शाहीनसुद्ध आहे. त्यासोबतच फॅशन डिझायनर मसबा गुप्तादेखील पहायला मिळते आहे. बालपणीच्या या फोटोत आलियाचा क्युट लूक चाहत्यांना खूप भावतोय. फोटो पाहून असे वाटतंय की हृतिक रोशनच्या करियरच्या सुरूवातीचे हे दिवस आहेत.

 हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हृतिक लवकरच आगामी चित्रपट सुपर ३०मध्ये गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हृतिकचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. सुपर ३० चित्रपटात एका गणिततज्ज्ञची कथा सांगण्यात आलीय जो गरीब मुलांना मोफत शिकवण्यासाठी कोचिंग इन्स्टिट्युट सुरू करतो. हा सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय.


तर आलिया भटच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ती वाराणासीमध्ये ब्रह्मास्त्र सिनेमाचे शूटिंग करत आहे.

या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

या चित्रपटा व्यतिरिक्त आलिया भट सध्या रणबीर कपूरसोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आहे. 


Web Title: Find out who is with Hrithik Roshan in the photo, Bollywood actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.