Filmmaker Mani Ratnam hospitalised due to cardiac problems |  दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल
 दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

ठळक मुद्देमणिरत्नम यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.  रोजा ,बॉम्बे, दिल से,रावन,युवा,गुरू हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते दीर्घकाळापासून हृदयरोगाने ग्रस्त आहेत.  मणिरत्नम यांच्या कुटुंबीयांनी अद्याप मीडियाला कुठलेही अपडेट दिलेले नाही. तथापि बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, मणिरत्नम यांची प्रकृती गंभीर आहे.
सन २००४ मध्ये हिंदी चित्रपट ‘युवा’च्या शूटींगदरम्यान मणिरत्नम यांना हृदयविकाराचा  झटका  आला होता. यानंतर २००९ आणि २०१५ मध्येही त्यांना प्रकृतीचा त्रास झाला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा झाली होती.  गतवर्षी जुलै महिन्यांतही मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली होती.   ‘चेक्का चिवंथा वनम’या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केल्यानंतर या चित्रपटाच्या एडिटींगमध्ये व्यस्त असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले होते.
 मणिरत्नम यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.  रोजा ,बॉम्बे, दिल से,रावन,युवा,गुरू हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८८ मध्ये मणिरत्नम यांनी तामिळ अभिनेत्री सुहासिनीसोबत लग्न केले. त्यांचा एक मुलगा आहे.  ऐश्वर्या राय, आर.माधवन आणि संगीतकार ए.आर. रहमान यांना मणिरत्नम यांनीच प्रथम चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने मणिरत्नम यांचा आणखी एक सिनेमा साईन केला आहे. खुद्द ऐश्वर्याने ही बातमी कन्फर्म केली होती. कान्स २०१९ दरम्यान अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने या चित्रपटाबद्दलचा खुलासा केला होता.
मणिरत्नम यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मी हा चित्रपट साईन केला आहे. मी मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करणार, हे मी आता सांगू शकते. त्यांच्यासोबत काम करण्यास मी कायम उत्सुक असते. कारण ते माझे गुरु आहेत, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली होती. अर्थात यापेक्षा अधिक तपशील देण्यास तिने नकार दिला होता.


Web Title: Filmmaker Mani Ratnam hospitalised due to cardiac problems
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.