ठळक मुद्दे‘बाहुबली’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

‘बाहुबली’ स्टार प्रभासचा आगामी सिनेमा ‘साहो’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. येत्या १५ आॅगस्टला प्रभासचा हा चित्रपट चित्रपटगृहांत झळकणार आहे. तत्पूर्वी काल प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे म्हटले होते. हे सरप्राईज काय, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. अखेर या सरप्राईजचा खुलासा झालाय. होय, हे सरप्राईज म्हणजे,‘साहो’चे नवे पोस्टर.


काही क्षणांपूर्वी प्रभासने ‘साहो’चे नवे पोस्टर शेअर केले. ‘हे तुमच्यासाठी. माझ्या नव्या चित्रपटाचे नवे आॅफिशिअल पोस्टर.   १५ आॅगस्टला थिएटर्समध्ये भेटूच...,’ असे हे पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले आहे. हे पोस्टर आणि यातला प्रभासचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल.


‘बाहुबली’नंतर या चित्रपटात प्रभास एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. यासाठी त्याने ७ ते ८ किलो वजन घटवले आहे. सुजीत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट श्रद्धा कपूर झळणार आहे. हा श्रद्धाचा पहिला साऊथ सिनेमा आहे. याशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकारही यात पाहायला मिळणार आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘बाहुबली’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता बघता, ‘साहो’च्या मेकर्सनी गत २२ आॅक्टोबरला प्रभासच्या वाढदिवशी  शेड्स आॅफ साहो व्हिडीओ रिलीज केला होता. त्याचवेळी  शेड्स आॅफ साहो अशा सीरिजअंतर्गत असे आणखी व्हिडिओ रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार,  श्रद्धाच्या वाढदिवसाला याचा सेकंड पार्ट प्रेक्षकांसमोर आला होता. शेड्स आॅफ साहो हा प्रामुख्याने ‘साहो’चा मेकिंग व्हिडिओ आहे.  शेड्स आॅफ साहोचा पहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अक्षरश: क्रेजी झाले होते. 


Web Title: film saaho new poster out prabhas intense look makes fans crazy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.