​फातिमा सना शेखचा वेगळाच तोरा! म्हणे, माझी कुणाशीही तुलना करू नका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 05:00 AM2017-12-01T05:00:24+5:302017-12-01T10:30:24+5:30

फातिमा सना शेख बॉलिवूडमध्ये अगदीच नवखी आहे. होय, केवळ एक चित्रपट जुनी. पण फातिमा अगदी आत्तापासून तोरा दाखवू लागलीय. ...

Fatima Sana Sheikh lost a different! Say, do not compare myself with anybody !! | ​फातिमा सना शेखचा वेगळाच तोरा! म्हणे, माझी कुणाशीही तुलना करू नका!!

​फातिमा सना शेखचा वेगळाच तोरा! म्हणे, माझी कुणाशीही तुलना करू नका!!

googlenewsNext
तिमा सना शेख बॉलिवूडमध्ये अगदीच नवखी आहे. होय, केवळ एक चित्रपट जुनी. पण फातिमा अगदी आत्तापासून तोरा दाखवू लागलीय. होय, माझी कुणाशीही तुलना करू नका, असे फातिमा सांगतेय. अर्थातच तिचा इशारा कॅटरिना कैफकडे आहे. आमिर खानसोबत ‘दंगल’मध्ये फातिमा दिसली आणि एका रात्रीत स्टार झाली. आमिरच्याच पुण्याईने म्हणा तिला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा दुसरा सिनेमाही मिळाला. या चित्रपटात कॅटरिना व फातिमा दोघीही आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता एका चित्रपटात दोन नट्या म्हटल्यानंतर तुलना ही आलीच. पण फातिमाला ही तुलना खटकू लागलीयं. 



कॅटरिना फातिमापेक्षा बरीच सीनिअर आहे. इंडस्ट्रीत तिचा अनुभव मोठा आहे आणि विशेष म्हणजे, कॅटरिनाने प्रचंड मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला धड हिंदीही बोलता येत नव्हती. अ‍ॅक्टिंग व डान्स दोन्ही बाबतीत कॅटरिना मागे होती. या काळात बड्या बड्या अभिनेत्रींशी तिचीही तुलना झालीच. पण ही तुलना कॅटने अतिशय खिलाडू वृत्तीने घेतली आणि स्वत:ला सिद्ध केले. आज कॅटरिना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण इतक्या सीनिअर अभिनेत्रीसोबतची तुलना फातिमाला  खटकू लागली आहे. माझी कॅटरिनासोबत अजिबात तुलना व्हायला नको. कारण आम्ही दोघीही वेगळ्या आहोत. आमच्यात काहीही साम्य नाही, असे फातिमाचे म्हणणे आहे. 



ALSO READ : 
Trolled: ​फातिमा सना शेखच्या ‘शेमलेस सेल्फी’ने आणला लोकांना राग! वाचा सविस्तर!!

खरे तर फातिमा व कॅटरिनाची तुलना होण्यासाठी एक फोटो कारणीभूत ठरला. अलीकडे फातिमाने निळी साडी व पिवळ्या ब्लॉऊजमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती अगदी कॅटरिनासाररखी दिसतेय. तिच्या या फोटोनंतर चाहत्यांनी तिची व कॅटची तुलना सुरू केली होती. पण फातिमाला ही तुलना रूचली नाही. ती वेगळाच तोरा दाखवू लागली. आता हा असला तोरा तूर्तास तरी बरा नाही, हे फातिमाला कोण सांगणार?

Web Title: Fatima Sana Sheikh lost a different! Say, do not compare myself with anybody !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.