हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाचे आरोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती.याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे.

या अभिनेत्रीचं नाव फातिमा सना शेख असून आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

अभिनेत्री फातिमा सना शेखने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एक अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत फातिमाने तिच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सुरूवातीला कास्टिंग काऊचाही तिला सामना करावा लागला आहे. तसेच अवघ्या वयाच्या तिस-या वर्षी तिचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

फातिमा सना शेख म्हणाली, 'मी अवघ्या तीन वर्षाची असताना माझा विनयभंग केला गेला. लैंगिक अत्याचार हा एक कलंक आहे, म्हणूनच स्त्रिया आयुष्यात या अत्याचाराबद्दल कधीही बोलत नाहीत, परंतु मला आशा आहे की आज जग बदलले आहे. याबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. पूर्वी अनेकदा अत्याचार झाले की, गप्प बसायचे.

याविषयी बोलणे टाळायचे. लोक त्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करतील. कास्टिंग काउचचा सामना करण्याबद्दल बोलताना फातिमा म्हणाली की, एखदा तिला सांगण्यात आले होते की, काम हवे असले तर लैंगिक संबंध ठेवणे हा एकच मार्ग आहे.

"मी तडजोड करेन  तेव्हाच मला काम मिळेल ही ऐकताच माझ्या पाया खालची जमीनच घसरली होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठिण होता. मला अशाप्रकारची काम नको होती. जेव्हा जेव्हा  तडजोड करण्यास नकार दिला तेव्हाच माझ्याकडून अनेकदा काम काढली गेली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fatima Sana Shaikh Was Molested At The Age Of 3 She Also Talked About Casting Couch In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.