-रवींद्र मोरे
मुलांची जबाबदारी एकटे निभवणे कोणत्याही वडिलांसाठी सोपे नाही, मात्र या जबाबदारीला पुर्णत्वास नेत आहेत बॉलिवूडचे काही सिंगल फादर्स. बॉलिवूडमध्ये असे काही फादर्स आहेत जे आपल्या मुलांसाठी वडील पण तेच आहेत आणि आई पण तेच आहेत. १६ जून रोजी जागतिक फादर्स डे असल्याने जाणून घेऊया त्या बॉलिवूडच्या सिंगल फादर्सबाबत...

* करण जौहर


सिंगल फादर्सच्या यादीत सर्वात पहिले नाव येते ते करण जौहरचे. करण दोन मुलांचा एकटाच सांभाळ करतोय. त्याची मुले रुही आणि यश सरोगसीद्वारा झाले आहेत. तो त्याची जबाबदारी खूपच उत्कृष्टपणे निभावत असून त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो. करण बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांपैकी एक असून त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

* तुषार कपूर


अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरदेखील सिंगल फादर आहे. त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे. तुषार लक्ष्यची जबाबदारी एकटाच उत्कृष्टपणे निभावत आहे. सोशल मीडियावर तुषार कपूर आपल्या मुलाचे फोटो नेहमी शेअर करत असतो. तुषारने आपणास आजपर्यंत अनेक चित्रपट दिले असून त्यापैकी त्याचे ‘मुझे कुछ कहना हैं’ आणि ‘क्या कूल हैं हम’ हे प्रसिद्ध चित्रपट आहेत.

* राहुल देव


सिंगल फादर्सची चर्चा होत असेल आणि राहुल देवचे नाव त्या चर्चेत नसेल असे कदापी शक्य नाही. राहुल देवदेखील सिंगल फादर आहे. राहुलच्या मुलाचे नाव सिद्धार्थ आहे. २०१० मध्ये कॅन्सरमुळे राहुलच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर राहुलने आपल्या आयुष्याचे एकमेव उद्देश आपल्या मुलाला बनविले. सध्या राहुलचा मुलगा सिद्धार्थ यूके मध्ये शिक्षण घेत आहे. राहुल देव अनेक चित्रपटात दिसला असून पैकी एक पहेली लीला, यहाँ के हम सिकन्दर, बेनाम, जाने होगा क्या कच्ची सड़क, अस्त्रम, सरहद पार, इकरार, फाइट क्लब आदी प्रसिद्ध चित्रपट आहेत.

* राहुल बोस


राहुल बोस एक नव्हे दोन नव्हे तर सहा मुलांचा सिंगल फादर आहे. लग्नाच्या अगोदरच राहुल बोसने अंदमान निकोबारच्या सुमारे ११ वर्षांच्या सहा मुलांना दत्तक घेतले आहे. तो त्यांच्या शिक्षणापासून प्रत्येक जबाबदारी उत्कृष्टपणे निभावत आहे. राहुल आपणास विश्वरूपम,जैपनीज वाइफ, अंतहीन, तहान, दिल कबड्डी, मान गये मुगल-ए आजम, शौर्य आदी चित्रपटांमध्ये दिसला आहे.


Web Title: Father's Day 2019: karan-johar-to-tusshar-kapoor-these-are-bollywood-single-fathers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.