गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी फरहान बनला फोटोग्राफर, ग्लॅमरस अदा करतोय कॅमे-यात कैद, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:58 PM2020-11-20T18:58:48+5:302020-11-20T19:03:34+5:30

मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये शिबानी दांडेकरचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळतोय.

Farhan became a photographer for his girlfriend Shibani Dandekar, See Latest Pics | गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी फरहान बनला फोटोग्राफर, ग्लॅमरस अदा करतोय कॅमे-यात कैद, फोटो झाले व्हायरल

गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी फरहान बनला फोटोग्राफर, ग्लॅमरस अदा करतोय कॅमे-यात कैद, फोटो झाले व्हायरल

googlenewsNext

भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात.मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे अख्ख जगच घरात बंदिस्त झाले होते. हळुहळु परिस्थिती सुधारत असून सगळ्याच गोष्टी रूळावर येत आहेत. घरात बंदिस्त झालेले सेलिब्रेटीदेखील आता बाहेर पडु लागले आहेत. पुन्हा एकदा कामात बिझी होण्याआधी काही सेलिब्रेटी व्हॅकेशनसाठी रवाना झाले आहेत.आपल्या जवळत्या व्यक्तीसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे पाहाला मिळत आहे. 

सोशल मीडियावर ट्रेंडींग कपल फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरही एकमेकांसह व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. फरहान अख्तर गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसह सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये शिबानीचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळतोय.  तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे.शिबानी बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. 

तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये शिबानी  स्टनिंग दिसत आहे. एका फोटोमध्ये ती फरहानसोबत रोमँटिक पोज करताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिबानीचे हे ग्लॅमरस फोटो खुद्द फरहाने क्लिक केले आहेत. शिबानीच्या तो इतका प्रेमात आहे की, तिच्या एक से बढकर एक अदा कॅमे-यात कैद करण्यातच तो बिझी आहे.

 

मालदीवमध्ये शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरसमवेत फरहानची मुलगी अकीरा अख्तरही आहे. फरहानने नुकताच इन्स्टाग्रामवर अकिराचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अकिरा स्कुबा डायव्हिंग करीत होती. आ

Web Title: Farhan became a photographer for his girlfriend Shibani Dandekar, See Latest Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.