फरहान अख्तरच्या 'तूफान'च्या प्रेरणादायी टायटल ट्रॅक म्युझिक व्हिडीओ झाला लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:46 PM2021-07-13T17:46:43+5:302021-07-13T17:47:24+5:30

फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'तूफान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Farhan Akhtar's' Toofan''s inspirational title track music video has been launched | फरहान अख्तरच्या 'तूफान'च्या प्रेरणादायी टायटल ट्रॅक म्युझिक व्हिडीओ झाला लाँच

फरहान अख्तरच्या 'तूफान'च्या प्रेरणादायी टायटल ट्रॅक म्युझिक व्हिडीओ झाला लाँच

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'तूफान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरआधी, 'तूफान'ने एका अशा अँथमचे अनावरण केले आहे जो आपल्या उर्जेला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जाईल. सिद्धार्थ महादेवनच्या आवाजातील हा टाइटल ट्रॅक जावेद अख्तर यांनी लिहिला असून आणि शंकर एहसान लॉय यांनी स्वरबद्ध केला आहे. प्रेरक आणि शक्तिशाली असे हे नॉकआउट, गीत आपल्या आत देखील तूफान जागवेल. 
तूफान चित्रपट स्थानिक गुंड अज्जू भाईच्या अवतीभोवती फिरतो. हाच अज्जू भाई पुढे अझीझ अली नावाने व्यावसायिक बॉक्सर होतो. ‘तुफान’ ही आशा, विश्वास आणि आंतरिक शक्तीला आणि जिद्द आणि महत्त्वाकांक्षेची जोड असलेली कथा आहे.  


फरहान अख्तरने या चित्रपटातील भूमिका आणि अनुभवाबद्दल सांगितले की, “मी तूफानच्या खऱ्या अर्थाने प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीराने कितीही बळकट असली तरीही बॉक्सर असणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला ८ ते ९ महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. ”


'तूफान' चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकुर आणि परेश रावल यांच्या मुख्य  भूमिका आहेत. 'तूफान' चित्रपट १६ जुलैपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Farhan Akhtar's' Toofan''s inspirational title track music video has been launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.