farhan akhtar trolled after appeal to bhopal electorates after one week | भाई, हँगओवर नही उतरा क्या? फरहान अख्तरच्या ‘वोट अपील’नंतर चाहत्यांनी घेतली मजा
भाई, हँगओवर नही उतरा क्या? फरहान अख्तरच्या ‘वोट अपील’नंतर चाहत्यांनी घेतली मजा

ठळक मुद्देफरहानच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर तूर्तास तो आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशात नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकजण लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत. तसे ते फरहान अख्तरनेही केले; पण मतदान होऊन एक आठवडा उलटल्यानंतर. मग काय, लोकांनी फरहानची चांगलीच मजा घेतली.
फरहानने काल भोपाळच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘भोपाळच्या मतदारांनो, तुमच्या शहराला आणखी एका वायूकांडापासून वाचवण्याची हीच वेळ आहे,’असे ट्वीट फरहानने केले.

या ट्वीटद्वारे त्याने भोपाळच्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन तर केले; पण भोपाळवासीयांनी गत १२ मे रोजीच मतदानाचा हक्क बजावला, हे तो विसरला. यानंतर फरहान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. भोपाळमध्ये १२ मे रोजीच मतदान पार पडलेय, हे अनेकांनी त्याच्या लक्षात आणून दिले. भाई, हँगओवर नहीं उतरा क्या, अशा अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या.

 

‘दिमाग तो सही है? या पापा का डॉ. आर्थाे आयुर्वेदिक घुटने का तेल खांसी की दवाई समज के पी गये हो,’ असे एका चाहत्याने लिहिले. ‘अपुरे ज्ञान नेहमी धोकादायक असते,’ असे अन्य एका चाहत्याने लिहिले.वृत्त लिहिपर्यंत फरहानने हे ट्वीट डिलीट केलेले नव्हते.


फरहानच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर तूर्तास तो आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबतचा त्याचा रोमान्स जोरात सुरु आहे. लवकरच फरहान व शिबानी लग्न करणार, असेही मानले जात आहे. सध्या फरहान ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो प्रियंका चोप्रासोबत दिसणार आहे.


Web Title: farhan akhtar trolled after appeal to bhopal electorates after one week
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.