Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 10:19 AM2019-09-09T10:19:43+5:302019-09-09T10:21:54+5:30

बी-टाऊनचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर रोज असे काही पोस्ट करतात की क्षणात ते व्हायरल होते. सध्या एका अभिनेत्रीचा एक सिंगिंग व्हिडीओही असाच व्हायरल होतोय.

Farhan Akhtar Thinks Little Shibani Dandekar Is 'Too Much Cuteness' In This Throwback Video | Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?

Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?

googlenewsNext
ठळक मुद्दे शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती.

बी-टाऊनचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर रोज असे काही पोस्ट करतात की क्षणात ते व्हायरल होते. सध्या अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड आणि मॉडेल शिबानी दांडेकरचा एक व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. होय, शिबानीने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक चिमुकली आपल्या गोड आवाजात गाताना दिसत आहे. व्हिडीओती ही चिमुकली कोण? हे तुम्ही ओळखलेच असेल. तर शिबानी स्वत:च. 


‘जाने कहा मेरा जिगर गया जी’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ ही गाणी ती गाताना दिसतेय. शिबानीच्या वडिलांनी नवा व्हिडीओ कॅमेरा घेतला आणि अगदी सहज म्हणून शिबानीचा हा व्हिडीओ शूट केला. हाच व्हिडीओ शिबानीने शेअर केला आहे. शिबानीने हा व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीआवर कमेंट्स केल्या. अगदी फरहानने सुद्धा या व्हिडीओवर कमेंट केली. ‘टू मच क्यूटनेट,’ असे त्याने लिहिले.


फरहान अख्तरशिबानी दांडेकर या  ‘लव्ह बर्ड्स’चा रोमान्स सध्या जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही. गतवर्षी या कपलने आपले नाते जगजाहिर केले आणि यानंतर फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत.  पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. आता तर हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. 


 शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती. शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.
 

Web Title: Farhan Akhtar Thinks Little Shibani Dandekar Is 'Too Much Cuteness' In This Throwback Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.