Farhan Akhtar share romantic post for shibani dandekar | शिबानीच्या प्रेमात फरहान अख्तरचा हा शायराना अंदाज, लेडी लव्हसाठी दिला 'हा' सुंदर मेसेज
शिबानीच्या प्रेमात फरहान अख्तरचा हा शायराना अंदाज, लेडी लव्हसाठी दिला 'हा' सुंदर मेसेज

ठळक मुद्देफरहानने शिबानी सोबतचा फोटो शेअर करुन त्यासोबत रोमाँटीक शायरीदेखील लिहिली आहेएप्रिलमध्ये ते लग्नच्याबेडीत अडकणार असल्याचे समजतेय

फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबतचे फोटो सहज शेअर करताना दिसतात. सध्या ता 'व्हॅलेन्टाईन डे'वीक सुरु असतानाच फरहानने शिबानी सोबतचा फोटो शेअर करुन त्यासोबत रोमाँटीक शायरीदेखील लिहिली आहे.   


फराहन लिहितो, 'तुम मुस्कुराओ जरा... चिराग जलाओ जरा... अंधेरा हटाओ जरा... रोशनी फैलाओ जरा', अशा रोमाँटीक अंदाजात त्यांने आपले शिबानीवरील प्रेम व्यक्त केले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार एप्रिलमध्ये ते लग्नच्याबेडीत अडकणार असल्याचे समजतेय. फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्यावर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. कामाबाबत बोलायचे झाले तर फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 
 

Web Title: Farhan Akhtar share romantic post for shibani dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.