ठळक मुद्देपहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड आणि सुपरमॉडेल शिबानी दांडेकर सध्या प्रचंड दहशतीत आहे. मुंबईच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या शिबानीसोबत असे काही घडले की, त्यानंतर  तिला प्रचंड असुरक्षित वाटू लागले आहे.  होय, हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिबानीने हा अनुभव शेअर केला. महिलांविरूद्धचे वाढते गुन्हे, वाढत्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांनी शिबानीला आरपार हादरवून सोडले आहे.


तिने सांगितले की, ‘या महिलेवर बलात्कार झाला, त्या महिलेला जिवंत जाळले, अशा घटना आपण रोज वाचतो. या घटना निंदनीय आहेच, सोबत दहशत निर्माण करणा-या आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबईत राहताना मला कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते. पण काही आठवड्यांपूर्वी मी त्याचा अनुभव घेतला. मी रेस्टारंटबाहेर आले आणि मला माझी कार दिसत नव्हती. खरे तर दिवसाची वेळ होती. रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती. पण अचानक मला प्रचंड भीती वाटायला लागली. त्यादिवशी त्या रस्त्यावर मी जे काही अनुभवले ते भयावह होते. कित्येक महिला या अनुभवातून जात असतील, कोण जाणो. आपण आपल्या घरात, देशात आणि आपल्या मायभूमीवर सुरक्षित नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे. महिलांविरूद्धचे वाढते गुन्हे हे निंदनीय आहेत,’ असे शिबानी यावेळी म्हणाली.


 शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती. शिबानी दांडेकर अभिनयाबरोबर गाणे सुद्धा गाते. सध्या शिबानी फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. फरहान व अधुनाचा संसार 15 वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे.

Web Title: farhan akhtar girlfriend shibani dandekar scared for her safety and share a incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.