फरहान अख्तरशिबानी दांडेकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच शिबानी दांडेकर हिने फरहान अख्तरसोबतचा फोटो शेअर केला आहे. जो फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.


शिबानी दांडेकर हिने सोशल मीडियावर पिंक रंगाच्या गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने एक फोटो फरहान अख्तरसोबतचा शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे एकमेकांचा हात पकडून उभे आहेत आणि कोणत्यातरी विचारात मग्न असल्याचे दिसत आहेत. फरहानने या फोटोत ग्रे रंगांचा ब्लेझर सूट परिधान केले आहे. यातील त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटत आहे. या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. 


फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे.


अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे बोलले जात होते. 


फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुले आहेत.


गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती.


खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता.


पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. 


Web Title: Farhan Akhtar and Shibani Dandekar's Pink Romance, you also find yourself in love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.