फरदीन खानने घटवले कित्येक किलो वजन, त्याचा नवा लूक आला समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:16 PM2018-08-11T13:16:10+5:302018-08-11T13:17:01+5:30

फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. तो बॉलिवूडच्या पार्टींपासून, पुरस्कार सोहळ्यांपासून देखील दूर राहातो. त्यामुळे फरदीनची झलक कित्येक महिन्यांपासून पाहायला मिळालेली नव्हती.

Fardeen khan spotted on airport loses lot of Kg weight | फरदीन खानने घटवले कित्येक किलो वजन, त्याचा नवा लूक आला समोर

फरदीन खानने घटवले कित्येक किलो वजन, त्याचा नवा लूक आला समोर

googlenewsNext

फरदीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याची बॉलिवूडमधील ओळख ही चॉकलेटी हिरोची होती. त्याच्या दिसण्यावर अनेक मुली फिदा व्हायच्या. फरदीन हा अतिशय फिट हिरो होता. पण नंतरच्या काळात त्याने त्याच्या फिटनेसकडे लक्षच दिले नाही.

दोन वर्षांपूर्वी तर त्याचे वजन चांगलेच वाढले होते. फरदीन इतका गोलमटोल झाला होता की, त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. फरदीनचा हा लूक त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे धक्कादायक होता. हा खरंच फरदीन आहे का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला होता. त्याच्या या लूकवर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी टिंगल देखील उडवली होती.
 
फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. तो बॉलिवूडच्या पार्टींपासून, पुरस्कार सोहळ्यांपासून देखील दूर राहातो. त्यामुळे फरदीनची झलक कित्येक महिन्यांपासून पाहायला मिळालेली नव्हती. पण नुकताच तो त्याची पत्नी नताशा आणि मुलांसोबत मुंबई विमानतळावर दिसला. त्यावेळी त्याचे काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कारण या फोटोमध्ये तो पहिल्यापेक्षा चांगलाच बारीक दिसत आहे. त्याच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. फरदीनने त्याच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली असल्याचे यावरून दिसून येत आहे.

फरदीनने वजन कमी केल्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कारण फरदीनने गेल्या आठ वर्षांत एकही चित्रपटात काम केलेले नाही. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याच्या कमबॅकची वाट त्याचे फॅन्स नक्कीच करत आहेत. त्याने प्रेम अगन या चित्रपटापासून त्याच्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर जंगल, प्रायर तुने क्या किया, नो एंट्री, ओम जय जगदीश यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला. फरदीन खान प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे.  

Web Title: Fardeen khan spotted on airport loses lot of Kg weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.